पायवाट:-(5)



लहान पणी मळलेल्या पायवाटेने  अनवाणी चालण्यात ही मजा यायची, आपण मोठे होत गेलेा अन  मजेची जागा status ने घेतली. अनवाणी चालणं लज्जास्पद वाटू लागलं. पायवाटा ऐवजी चारचाकी गाडी, डांबरी रस्ते गरजेचे वाटू लागले, हे बदल जीवनावश्यक झाले. प्रत्येक जण स्पर्धेमध्ये धावू लागले. कोलाहलामध्ये एकमेकांचे आवाजही ओळखू येत नव्हते. मग त्याचे अर्थ काय समजणार,!आणि अचानक वेगवान गाडीला करकचून ब्रेक लागावा तसा लाँकडावून सुरू झाला. लोक खडबडून जागे झाले . क्षणात जीवनाचा अर्थ कळला ,, काा धावत होतो? ह्याचा अर्थ लावू लागले आराम आणि थोडी विश्रांती आवश्यक आहे .समजून मुबंई चा माणूस थोडा थांबला, लाँकडावून वाढत गेला चिंता वाढू लागली . लाँकडावून मध्ये अडकलेली माणसे भेटतील की नाही ह्याची काळजी वाटू लागली.  ATM पूढील रांगा वाढू लागल्या ह्या सर्वात एक वर्ग मोडत नव्हता...... 
मजूर वर्ग,! दिवसाला पैसे कमवून संध्याकाळ ची भ्रांत मिटवणारा ,श्रम करून वर आकाश आणि उशाला दगड अशा अवस्थेत शांत झोप घेणारा... 
मालकांनी, ठेकेदाराला सांगून काम थांबवलय .काम नाही तर मालकाकडून उदारी नाही, उदारी नाही, मजूरी नाही, अन जेवणही नाही .सरकारची मदत कुणाच्या घशात ह्याची ना त्यांना जाणीव ना सामान्यांना! 
 गावाकडील वाट धरायला ना तिकीटाला पैसे ना विचार कळायला वेळ. वाट पाहून,परतीची वाट धरली. अनवाणी,! पायाला चटके, पाेटात भूकेचे डोंब, खड्डे,! मजल दरमजल करून गावाला जावून काय करणार ? तिथेच ,रोजगार नव्हता, म्हणून मुंबई ची वाट धरलेली,....
       पावसाळा जवळ आला ,आणि त्यांच्यासाठी एक आशेचा किरण घेवून  आला. कच्चे रस्ते पक्के करण्यासाठी, रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी, खड्डे बुजवण्यासाठी, रस्त्यावर बुलडोजर, मजूर दिसू लागले त्यांच्यासाठी कोरोना आणि बेरोजगारी दोन्ही सारखेच, दोन्ही कडून मृत्युच्! त्यांनी बांधलेल्या रस्त्यावरून  contractor च्या गाड्या धावणार आहेत. लाँकडावून मध्येही त्यांनी स्कील वापरून, जुगाड करून रस्ता concret करण्याचे contract मिळवले आहे. देवाने इथेही कष्टकरी गरीबांची बाजू न घेता श्रीमंत contractor आणि त्याच्या status ची बाजू घेतली. देवाने ही भ्रष्टाचार केला. लहानपणीचे निरागस पणे पायवाटेने अनवाणी चालणे हे कष्टकचर्याचे तळपायाला चटके घेवून चालणे झाले. त्यांच्या निरागस लहान मुलात अनवाणी चालण्याची मज्जा नव्हती, तर जीवनाचे विदारक सत्य आणि तळपत्या उन्हाचे चटके होते. 
समाप्त. 
Varsha patil.©
Uran (navi mumbai) 
9819406813
Bsc. DMLT
12:20am
18/5/20

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4