लाँकडाउन


लाँकडाउन किती दिवस  चालणार? 
काम रेंगाळलीत, 
कित्येक गोष्टी ह्या अनाकलनीय, किंवा समजण्यास कठीण असतात. सामान्य माणसांना त्याची गंभीरता जाणवत  नाही. 
कोव्हीड 19, हा वायरस संसर्गाने पसरतो, त्याचा संसर्ग हा संक्रमित झालेल्या माणसाच्या स्पर्शाने होतो. संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत जास्त दूर रहाणे गरजेच आहे. टाईमपास म्हणून गप्पा मारायला शेजारच्या घरी जावू नका ते तुमच्या फायद्याचे नाही. कामा शिवाय, बाहेर पडू नका, पोलिस नर्स, डाँ, ह्यांना सहकार्य करा. सीमा सील करून जास्तीत जास्त संसर्ग रोखता येईल. खूप कठोर कारवाई सहज देश घेवू शकत नाही .नाहीतर चीन मध्ये फैलाव सुरू होताच आपण विमान सेवा बंद पाडून त्याच संक्रमण रोखू शकलो असतो. देशाला जागतिक पातळीवर असे निर्णय लगेच घेता येत नाहीत.
लाँकडाउन हा निर्णय कधीपर्यंत? खर तर कोवीड 19 आटोक्यात येईपर्यंत ..... 
सरकार कदाचित हा निर्णय कसा ,केव्हा घेईल. ह्या पेक्षा आपल्या शेजारील राष्टांनी त्यावर कशी मात केली. हे पाहणे जरूरीचे आहे. 
चीनमध्ये तो प्रथम हुआन ़शहरातील मच्छीमार्केट मधून सुरू झाला. पण त्याच देशातील बिंजीग शांघाय, शहरात पसरला नाही. म्हणजेच जगभर झाला, पण त्यांच्या शहरात कसा झाला नाही? , तर त्याच्या सरकारच्या लक्षात येण्या आगोदर तेथून संक्रमित झालेले लोक परदेशात(इतर देश) स्थंलातरीत झाले. (वाचनात आले की काही श्रीमंत लोक भारतात उपचारासाठी आले) पण त्यांच्या सरकारने बिजींग व शांघाय शहरे i(solated )अलिप्त ठेवली. व संक्रमणावर मात केली. 
आपणही अलिप्त राहून आपली शहरे राज्ये संक्रमणापासून वाचवू यात. 
लाँकडावून हे पाउल म्हणूनच उचललेले आहे. त्याला सहकार्य आपण सर्वांनी करूयात. 
 पावूस जवळ येतोय, आपल्याकडील पावसाचे दिवस सर्वाना माहीत आहेत.   लाँकडावून काढल्यानंतर लगेच  आँफीस मध्ये खूप दिवसांनी भेटल्यानंतर मिठ्या मारणे, हस्तांदोलन करणे, किस करणे, पायाला स्पर्श करणे. ह्या गोष्टी टाळाव्यात. कारण मी माझ्या मागच्या लेखात लिहिले आहे वायरस हे वनस्पती, बँकटेरीया, animal ह्यांच्या पेशीत सुप्तावस्थेत राहतात. आपली प्रतिकार शक्ती कमकुवत झाली की ते डोके वर काढून आपल्यावर (attack)हल्ला करतात. बंर १३ प्राण्यामधील व ७ बँकटेरीया मधील व एक वनस्पती मधील २१ प्रकारच्या वायरस बरोबर आपली प्रतिकार शक्ती लढत असते. (आणखी नविन unknown किती प्रकारच्या असतील माहीत नाही।) तेव्हा  उगाचच बाहेर पडून आपल्या प्रतिकार शक्ती ला काम देवू नका. 

वर्षा पाटील. 
Bsc. DMLT. 
(Ex microbilogist
& research assistant) 
(Ex head of pathology dept) 
Uran. 
28/3/20
8:45pm
Tip: वरील लेख गृहिणी लिहीत नसून त्यातील अनुभव असलेली  medical पाश्वभूमी असलेली worker च लिहीत आहे. विषयाचे गांभीर्य ओळखून शिक्षण व designation लिहीले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4