अन्नपूर्णा(3)
मी१०-१२वर्षाची असेन ,एकदा मामाच्या घरी आम्ही लहान मुल खेळत होतो. मोठा मामा आमच्या मुलांजवळ आला व सर्वांना म्हणाला तुमचे हात पाहू द्या, सर्व एक एक करत हात दाखवू लागले, तो सर्वांना काहीना काही सांगू लागला, माझा नंबर आला मी माझा हात दाखवला, मामा सांगू लागला ....त्याने मला इतरांहून वेगळ सांगितले. सर्व मुल कान देवून ऐकू लागले. त्यांनी म्हटले, तूझ्या हातावर गव्हाकूंर आहे. प्रत्येक बोटाच्या पहिल्या पेरावर शंकू असून, उंचवटा आहे. तू अन्नपूर्णा आहे स, तूला कधीही अन्नाची कमतरता पडणार नाही. तू जिथे जाशील तिथे लक्ष्मी वास करेल, त्या जागी कोणीही भुकेला, कंगाल रहाणार नाही. असं वेगळ पण छान ऐकून मी हारखून गेले. त्यांनी सर्वाना काहीनांकाही छान सांगितले पण, सर्वाना, मला सांगितलेल ऐकून हेवा वाटू लागला. मी मामाची माहीत नाही ,पण मोठ्या मामाची आवडती भाची होते. तसेच माझी आई मामाची आवडती बहिण, व मामीची आवडती वंन्स(नणंद)होती.
मामाच्या घरा जवळच शाळा होती. मी व मामाची मुलगी तिंरग्याच्या खांब्याला पकडून खेळत होतो. शाळा नुकतीच सुटलेली होती. शाळेच्या ओट्यावर दोन गुरूजी गप्पा मारत बसले होते. ते आमच्या जवळ आले मामाच्या मुलीला आधीपासून ओळखत होते. मला नाव विचारले, परिक्षा नुकतीच संपून सुट्टीत मी मामाकडे आले होते. त्यांनीही माझा व मामाच्या मुलीचा हात पाहीला, मला म्हटलं तूझ्या चाफेकळी बोटाच्या खाली तळहातावर अधिकच चिन्ह आहे. (+) तू हुशार आहेस. (तेव्हा मी खरच हुशार होते, मला अख्खे धडे जसेच्या तसे पाठ होते.३० पर्यंत पाढे तोंडपाठ होते.😄) आपण लहानपणीचे जसेच्या तसे मोठे होत नाही हेच खरे!
माझे जे नाव आहे त्याच नावाची सून मामानीं आणली, हुशार, सुदंर......
यदाकदाचित माझ्यावर त्यांच खरच प्रेम असेल........
पैशाची जशी नशा असते, तशी अभ्यासाची ही असते, मुली लग्न करून आल्या की त्यांना परत शिक्षण घेण्याचे वारे वाहू लागतात,त्यां शिक्षण पूर्ण झाल्यावरच त्यांची लग्न केलेली असतात ,मग आणखी शिक्षण, म्हणजे कामापासून फारकत,(माझ्याही मनात MBA करायचे, नाहीतर, Msc करायचे वारे वहात होते, पण मला permission मिळाली नाही, बाप पैसे देतोय का ❓ विचारून ये सांगितले, मी बापा पर्यन्त पोहोचले नाही.) असो तेव्हा अॅडमिशन मिळून परवानगी नव्हती. नंतर वेगळी, स्वंतत्र राहू लागल्यावर कितीही प्रयत्न करूनही admission मिळाली नाही. तेव्हा लग्नानंतर शिक्षण हा माझा विषय राहिला नाही.काही भलत्याच नशीबवान असतात असो.
ज्या मामाने मला तू अन्नपूर्णा आहेस सांगितले ,ज्याने माझे नाव सारख आहे त्या मुलीला घरी सून म्हणून आणलं,त्या मामाच्या सुनेने शिकते, प्रवास करते ,,दमते.सांगून घरात जेवण करायला असहकार पुकारला. नवर्याला कामावरून नाष्टा, जेवणासाठी मिळणारे कुपन्स ताब्यात घेवून कंपनीच्या, hospital canteen मध्ये आपलं जेवण करून घेतल, सून घरात जेवत नाही, म्हणून सासू सासरे व दिर् घरात चूल पेटवत नाहीत. ३दिवस उपवासानंतर company ची colony सोडून वेगळ भाड्याने रहायचा निर्णय घेतात.🙏
ह्या सर्वाची सुतराम कल्पना नसलेली, सेम नाव असलेली भाची ज्या मामाने तूला अन्नपूर्णा आहेस सांगितले, त्या मामावर उपाशी रहायची वेळ आणलीस, हिनेच केल म्हणून (नवरा म्हणणार्या पुरुषाकडून) मार खाते. सर्वच अकालनीय, नियतीच घडवते मान्य कराव लागत,पण ज्याने केले त्यालाच शिक्षा मिळावी. नाहीतर काळ सोकावतो. व त्याचे विपरीत परिणाम होतात.
आज आई, किंवा मामा हयात नाहीत. पण मना पटलावर ओढलेल्या रेघोट्या, चरे त्या घटनांची ग्वाही देत तसेच राहतात.
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
समाप्त
Varsha patil. ©
Bsc DMLT
Uran(Navi, mumbai)
3/6/20
12:15 pm

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा