शेजार भाग ४


 कामवाली आधुनिक यंत्र सामुग्री वापरत नाही. ती तशीच पडून आहेत, आम्हाला ती वापरता येत नाहीत, कामवालीला ही ती वापरायला जमत नाहीत,  आम्हा दोघांना काय काम असणार ४ चपात्या भाजी, पण आताशा मला त्या करायला होत नाही, काकी उद्गारल्या, आपल्याशी बोलायला कुणीतरी मिळाल्याचा दोघांच्या चेहर्यावर आंनद दिसत होता, काही काही कामासाठी सोसायटीची जूना माणसं मदत करतात, जसं की बँकेचं काम, कधी काही डाँ, कडील औषधे आणून देण्याचं काम मुलींनी आधुनिक सर्व सुखसोयी करून दिल्यात पण वयपरत्वे त्या नीट करायला जमत नाहीत, काका उद्गारले, अर्पणा ने मनाशीच काही खूणगाठ बांधली व दोघांचा निरोप घेवून घरी आली, तिने संध्याकाळी सर्व प्रथम आपल्या मुलांची ओळख आपल्या नविन आजी आजोबांशी करून दिली. त्यांनतर रात्री आपल्या नवर्याला आपल्याला लाभलेले शेजारी दाखवून त्यांच्याशीही ओळख करून दिली. दोन्ही मुली 👭रात्री विडीओ काँल करत, त्याऐवजी आजी आजोबांना विडीओ काँल कसा करायचा ते शिकवले, आपला पूर्ण परिवार दाखवून स्वताच्या परिवाराची ओळख करून दिली,आम्ही आजी आजोबांची काळजी घेण्यास आहोत तरी तुम्ही निश्चिंत रहा सांगितले. कामवाली सकाळच्या वेळेस येते, तेव्हा त्यांच्याकडे जावून तिला सर्व उपकरणे कशी वापरावीत, कशी स्वच्छ करावीत, त्यांची काळजी घेवून कशी सुस्थितीत ठेवावीत, हे प्रात्यक्षिके करून दाखवले त्यामुळे कामवालीचा विश्वास दुणावला, व ती खूश झाली, कारण तिला एवढी महागडी उपकरणे वापरावयास मिळाली, होती.  

स्वताचा बाजारहाट करताना बाहेर जाण्याआधी काकाकाकींना काही हवं नको ते आणून देवू लागली, त्यांचे बँकाचे व्यवहार काही पेंडीग कामे सुरळीत केली, त्यांना सर्व आँन लाईन व्यवहार शिकवले जे थरथरत्या हाताने जमत नव्हते ते स्वता त्यांना करून देवू लागली, जसे की बिल भरणे, आँन लईन हव्या असलेल्या वस्तु मागवणं, आता त्याच्या दोन्ही मुलीही तिच्या फोन अ फ्रेड झाल्या होत्या, मुल आईने केलेले नवनवीन पदार्थाच्या डिश आजी आजोबांना  नेवून देवू लागले, त्यांना हक्काचे आजी आजोबा मिळाले, अपर्णा ला सासु सासरे/आई बाबा मिळाले, संसाराला आशिर्वाद मिळण्यासाठी, किंवा मनातल्या चार गोष्टी सांगायला वरिष्ठाचा सहवास मिळाला, महत्वाच म्हणजे स्वताची तीच सर्व काम करताना आपण फक्त घरकामात वेळ घालवतो असं न वाटता कुणाला तरी सोबत करतोय, ह्याच समाधान वाटू लागल  त्यांच्या गँलिरीतील अनेक फुलझाडे आणून अर्पणा ने आपलीही बाग सजवली, आपला फावला वेळ छंदामध्ये घालवला, नवनवीन केलेल्या पाककृतीचे कुणाला कौतुकच नाही, असं म्हणणारी अर्पणाला साध्या उपम्याचे, अगदी सुरेख झाला होता, उपमा म्हणून कौतुक मिश्रित शब्द ऐकायला मिळू लागले होते, 

अर्पणाच्या नवर्याला नविन जून्या विषयावर ,बजेटवर गप्पा मारायला शेजार मिळाला, 

मुलांचे, स्वताचे, लग्नाचे वाढदिवस 🎂🎉🎁साजरे करण्यासाठी पाहुण्यांची गरज न भासता,मेजवानी साठी त्यांच्या घरी आजी आजोबांची वर्णी लागू लागली. 

अर्पणाची तशीच काही महत्वाची कामं करायला एकटी बाहेर जाताना विश्र्वासून मुलांना आजी आजोबा ंकडे सोपवून जावू लागली. 

स्वताला हवा तसा संसार अर्पणा करतच होती पण त्याच बरोबर हवा तसा शेजार ही तिने तयार केला होता, अगदीच घाईत/अडचणीत कामवाली तिला मदत करत  होती. तिने स्वताचे करिअर जरी सोडले असले तरी स्वताला हवा तसा परिवार तयार करून 🏠 घर सुखी समृद्ध ठेवायचा प्रयत्न करत होती. आपल्या घरातील सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी चांगला शेजार हा हवाच! अपर्णा त्याबाबतीत सुखी होती. 


वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई 

 ाांाांाांाांाांाांाांाााांाांाांाांाांाांाांाा


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4