हाव
हाव :
आपल्याला एकट्याला सर्वच काही हवं असतं, म्हणजे बघा,! आपल्याकडे भरभरून सर्व असेल आणि तरीही एखादी अनमोल वस्तु अथक प्रयत्न करूनही मिळत नसेल, आणि ती एखाद्या सामान्य माणसाकडे असेल, तर आपल्या मनात असुया निर्माण होते, मला न मिळता त्याला कशी मिळाली, ? "ती," इर्ष्या असते, आपल्यापेक्षा दुसर्याला जास्त मिळू नये, / फक्त आपल्यालाच मिळावं .आपलं मन का ?तृप्त होत नाही. का? आपण इतकं अभिलाषी होतो.
कोरोना सुरू कोरोना सुरू झाल्यापासून मला माझ्या वडिलांनी लहानपणी सांगितलेली एक गोष्ट सारखी आठवते, एकदा एका गरीब शेतकर्याला देव प्रसन्न झाला, माग हवे ते म्हणाला त्याने मी गरीब शेतकरी आहे तेव्हा मला जमिन द्या म्हणाला, देवाने त्याला उद्या डोंगराच्या पायथ्याशी सुर्याेदयापासून सूर्यास्ता पर्यत जेवढी जमिन व्यापशील तेवढी तूझी होईल असा वर दिला, शेतकरी खूष होवून रात्रीच डोंगर पायथ्याशी जावून बसला, पहाटे तो चालू लागला, नंतर धावू लागला दूपारी सुर्य माथ्यावर तळपू लागला त्याला चटके लागू लागले तहान भूक लागली, पण जमिन जास्त हवी म्हणून तो थांबला नाही सुर्यास्ता पर्यतं तो खूप धावला त्याने मागे वळून पाहिले,खूप जमिन व्यापलेली पाहीली,पण अजून दोन चार पावले असा विचार त्याच्या मनात आला, आणि(रक्ताच्या उलट्या होवून🙏) तो जमिनीवर कोसळून मरण पावला, व्यापलेली जमिनही त्याला वापरता आली नाही, कसलीही हाव नकोच, फसवणूक ही नको🙏
समाप्त
वर्षा प्र पाटील. ©®
उरण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा