भाग:३ शेजार




सकाळची काम आटपून  अपर्णा  चहाचा कप घेवून वर्तमान पत्र वाचत बसली, आणि अचानक तिच्या मनात कालचा विचार डोकावून गेला. तशी ती लगबगीने उठली, आणि गॅसवर आधण ठेवलं , डब्यातून रवा शोधून काढला, साजूक तुपात खरपूस भाजून काढला त्यात, दूध उकळवून ओतले, वेलची ची बारीक पूड ,चारोळी, काजू, बदाम, किशमिस, जायफळ टाकले, फळातील दोन केळी कुस्करून त्यात टाकली, रवा शिजलाय का पाहून, त्यात साखर घालून बाजूने साजूक तूप सोडले व ़झाकण लावून एक दणाणून वाफ आणली, फ्रिजमध्ये फूल ,फळ ,काढली देवाची पूजा केली. फूल वाहीली, फळांचा, शिर्याचा नैवेद्य दाखवला. नैवेद्याचा शिरा नविन डबा घासून स्वच्छ पुसुन त्यात भरला, चार प्रकारची फळ पिशवीत भरली, पानांत गुंडाळलेले दोन गजर्यापैकी एक गजरा स्वताच्या डोक्यात माळला दूसरा पिशवीत टाकला, नी बाजारात जाण्याइतपत नवी साडी नेसून घराची चावी घेवून लँच लावले, व समोरच्या फ्लॅटची बेल दाबली, खूप वेळाने ८५-९० कडे झुकलेल्या गृहस्थाने दार उघडले, व त्रासिक नजरेने  पाहून विचारले काय आहे? त्यांच्या प्रश्नाने अपर्णा ला आपण उगाचच शहाणपणा केला असं झालं, ती क्षणभर थांबून म्हणाली , मी अर्पणा तूमच्या शेजारी आम्ही नविनच रहायला आलो आहोत, त्या उंच कृश देहयष्टी च्या माणसाच्या डोक्यावरच्या आठ्या जराही कमी झाल्या नाहीत.  आम्ही पाहिलंय ते आल्या आल्या  काय काम काढलं या आविर्भावात  उभे होते, तेवढ्यात कुणाशी बोलताय एवढं म्हणत, तश्याच कृश ८०-८५च्या गृहिणी बाहेर आल्या, काकानी ह्या शेजारच्या आल्यात काय काम काढले ते बघ म्हणून आत जायला वळले, काकीनी ये ग आत ये म्हणत, मला सोफ्यावर बसायला सांगून स्वत; बाजूला बसल्या, अर्पणा ने स्वताचे नाव सांगून पिशवीतील फळे गजरा व प्रसादाचा डबा काकूंच्या हातात दिला, गजरा केसात माळून कांकूनी कशाला आणलंस एवढ? नुसती ओळख करायला आली असतीस तरी आम्हा दोघांसाठी पुरेसे होतं, म्हणतं, स्वयंपाक घरात गेल्या, येताना डब्यातील शिरा बशीत ओतून त्या चमचा घेवून आल्या, येताना हळदी कुंकवाचा करंडा व झाडावरचे गुलाबाचे फूल घेवून आल्या, हळदी कुंकू फूल देवून बशीतील प्रसाद चमचाभर  अर्पणा च्या हातात दिला, व डिश काकांच्या हातात दिली, व आत चहा बनवण्यास निघून गेल्या, मघाचचं अवघडलेपण जावून काका प्रसाद खाता, खाता गप्पा मारू लागले, आम्ही सोसायटी सुरू झाल्यापासून इथे राहतोय  आम्ही बिल्डींगचे सर्वात जुने सदस्य आहोत, पण वयोमानानुसार कशातच भाग घेता येत नाही. तेवढ्यात काकू चहाचा ट्रे घेवून हळूहळू आल्या अर्पणा ने सर्वाना चहा दिला, व ती स्वताच्या परिवाराबद्दल, पूर्वी कुठे रहात होतो, त्या विषयी माहीती सांगू लागली, मग काहीही मोकळे पणाने बोलू लागल्या, त्यांच्या दोन्ही मुली लग्न होवून बाहेर सेटल झाल्या होत्या, त्यांनी नियमीत पैसे पाठवण्याची सोय केली होती घरात सर्व अधुनिक मशीन आणून दिल्या होत्या अगदी डिशवाँशर ते क्लिनिंग मशीन पर्यतं चांगली कामवाली ठेवली होती, जी सर्व झाडू पोचा, करून चपाती करून, जेवण करून जाते, पण बोलायला कुणीही नाही, दररोज रात्री झोपायच्या आधी मुलींचे फोन येतात तेवढेच, ह्यांचा (काकांचा) तरुणपणी कडक स्वभाव, त्यामुळे जास्त कुणी नातेवाईक नाहीत.बिल्डींगच्या मुलांनाही धाक वाटत असे त्यामुळे  मोठी मुलेही कधी इथे फिरकत नाहीत. 

क्रमशः

वर्षा प्र पाटील. ©®

उरण

  

 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4