पैका(पैसा) भाग 2

गण्या जसा मोठा होत होता, तशी आजी ही म्हातारी होत होती. पण आता आजीला गण्य चिंता नव्हती, कारण गण्याला जग, जिवन समाज ह्या शब्दांचा अर्थ  माहीत नसला तरी ते जगता येवू लागले होते, शाळेतून घरी येताना तो मास्तरांची छोटी मोठी काम करत असे, आजी इतर ठिकाणी काही कामं करी, पण पैका असा काही मिळत नसे, मोबदल्यात  भात जेवण शिळे असेच मिळे, 

शाळेला सुट्टी असली की गण्या डोंबल(गोलाकर छोटेखानी तोड असलेली टोपली)पाठीवर लटकून समुद्रावर जात असे, पाण्याच्या लाटा अंगावर घेत तासन तास तो मासे, खेकडे, शिंपले  पकडत असे, आणि आजीला आणुन देत असे आजी ते मासे तीन चार दिवस तरी पुरवत असे, दोघांना ना भविष्याची चिंता  होती ना आपलं उद्या काय होणार  त्याची,.. ..

अशाच एका सुट्टी च्या दिवशी जेवण उरकून गण्या डोंबल घेवून समुद्रावर गेला, भटकताना त्याला एवढी मोठी चिंबोरी मिळाली की ती टोपलीत शिरेना,चिंबोरी खडकाच्या कपारीत किंवा वाळूत खोलवर दडलेली असे ती खणून काढायला गण्या कडे हत्यार नसे,तो हाताने, काठीच्य टोकाने खणे मग उलटा सुलटा धागा त्या चिंबोरीच्या पायात अडकवून त्याला करकचून बांधे,नी टोपलीत टाके ती चिंबोरी त्याने धाग्याला  बांधून तो तसाच हातात घेवून आला, घरी येताच दारातूनच त्याने आजै बघ मी काय आणलं म्हणाला ,,आजीने हातातील चिंबोरी पहात म्हंटल असाच जा नी मास्तरला देवून ये, पाठीवरच डोंबलं  खाली ठेवत तसाच आपला,जीव थकला ह्याची जाणीवही नसलेल,तसाच रेतीने माखलेला ओल्या कपड्याने गावाकडे मास्तरांच्या  घरी निघाला दारातूनच त्याने मास्तर गण्या आलाय थोड काम काढलं होत ंं,गाण्याच्या  आवाजाने मास्तर बाहेर आले काय काम आहे, इतक्या संध्याकाळी  दिवेलागणीच्या वेळेस इतकं चालून आलास,  हातातली चिंबोरी उचलून गाण्याने मास्तरांना हे द्यायला आलो होतो. गुरूजी त्या 12-13 वर्षाच्या मुलाकडे अवाक होवून पाहू  लागले, त्यांनी बायकोला चहाचा कप आणायला सांगितला गण्याच्या  हातातली  चिंबोरी बायको कडे दिली, आणि बायकोला काही शिळपाक तांदुळ  काही देत असशील तर दे म्हणाले,आत जावून येतो तिथपर्यंत  चहा पित बस म्हणाले,  थोड्या वेळात मास्तर बाहेर आले त्यानी दोन चार पिशव्या  आणल्या, एकात तांदुळ  एकात थोडसं अन्न एकात काही कपडे होते, त्याला सांगितलं घरी जावून  स्वच्छ अंघोळ  कर ओले कपडे बदल आणि थोडे बायको कडून घट्ट  करून  घेतलेले कपडे त्या पिशवीत होते ते दिले, ते घाल  ,म्हणाले मास्तरांनी  सदर्याच्या खिशात हात घातला 25 पैशांच नाणं दिलं आणि म्हणाले ,जेव्हा केव्हा चांगले मासे मिळतील तेव्हा घेवून येत जा संकोचू  नको. 25 पैशाच्या नाण्याकडे पाहात गण्यानी विचारले हे तुमच्याकडे कुठून आले, मास्तर हसले, म्हणाले अरे तू मला चिंबोरी दिलीस त्या बदल्यात मी हे तूला दिलेत, तसच मी तूला शिकवतो  त्या बदल्यात मला असेच पैशा पेक्षा  जास्त असलेले रुपये मिळतात. मग मी आता ह्या पैशाचं काय करू? गण्याने  निरागसतेने विचारले, मास्तर  म्हणाले तू तूला गरजेची हवी ती वस्तू गावच्या बाजाराला जावून घेवून ये,  ती वस्तू जर चार आणण्यापेक्षा महाग असेल तर असे पैसे आजी जवळ साठवायला दे. जास्तीचे पैसे जमले की तूला हवी ती वस्तू  आणता येईल. मास्तराला गण्या म्हणाला हे माझं पहिलंच पैक  आहेत. मास्तर हसले म्हणाले ही तुझी पहीली कमाई असली तरी। तू 10-12 वर्षाचा आहेस म्हणजे  तू तुझ्या  लहान वयातच कमवले आहेस,  तुझ्या वयातील मुलं  आपली वस्तु आणण्यासाठी  आई/बाबाकडे पैसे मागतात, आपल्या  वर्ग मित्रानी सांगितलेली गोष्ट गण्याला आठवली, अंधार पडायला लागला होता,  गण्याची  पावलं झपझप झोपडीकडे वळली.. ... .. 

क्रमशः 

वर्षा पाटील ©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4