पैका(पैसा)भाग3
गण्याला आज पैसा कळला होता, आता त्याला त्याचा उपयोग शिकायचा होता ,आजीनी केलेलं जेवण व मास्तरानी दिलेल्या जेवणावर भूकेलेल्या गण्याने ताव मारला नी झोपी गेला.
चार आण्याचे ग़ण्याला चणे खावेसे वाटले, कारण गावचा बाजार त्यांनी पाहीलेला नव्हता, तिथे काय मिळत ते त्याला ठावूक नव्हतं, मग ते पैसे आजीला द्यावेसे वाटले पण मग त्याला काही हवे असेल तर बाजारातून आणता येणार नव्हतं आपल्याकडे पैसे आहेत हे कळलं तर कुणीही ते चोरेल असंही त्याला वाटलं.....
, आजीला वाटल काही कपडे व थोडे जेवण व कणी हेच चिंबोरीच्या बदल्यात मास्तरानीच नेहमी प्रमाणे दिले आहे, तिला कधी जास्त पैसा वापरायला मिळाला नव्हता, कधी कुणी जास्त कामाचे पैसे दिले तर मग मात्र ती तेल वात आणायला वापरे, तसं समुद्र किनारी तिला, सरपण, नारळ, मीठ, मासे, मिळत मसाला कुटायच्या कामात मसाला, भाजी खुडण्याच्या कामात ताज्या भाज्या नी शेतीच्या, कामात तांदूळ, कणी मिळत, पण पैसे क्वचित सणाला खुष होवून कोणी दिले तर किंवा जास्तीच्या कामाचे मिळाले तर.........
गाण्याने खूप विचार केला, व पैसे आजीला दिले, आजी खूपच खुश झाली. गण्याला म्हणाली बापाने हे खोपट बांधून खूप वर्ष झाली ह्या पावसाळ्यात जर खोपट बांधलं नाही तर आपल्याला गावात कुणाकडे तरी आसरा शोधायला लागेल, गण्या काहीतरी विचार करत होता, पण आजीचे विचार ऐकून त्याला पैसे आजीला दिल्याचे समाधान वाटले.
त्याने शाळेत जावून त्या मुलाला विचारले, तूला मासे आवडतात का? त्या मुलाने सांगितले खूपच आवडतात, गाण्याने त्याला सांगितले मी समुद्रात जावून मासे आणतो सुट्टीच्या दिवशी, तुला पण दिले असते पण तुझा घर नाय माहीत, त्या, मुलाने शाळेपासून प्रत्येक खाणाखुणा सांगत त्याला आपला पत्ता दिला, गण्याने थोड थांबून विचारलं तुझा बा साहेब हाय पण मग मला ओळख दावशील ना? त्या मुलाने गण्याच्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाला मी घरी जावून पैशा बद्दल आईला सांगितले, आईने तूला मदत करणार्या मुलाशी म्हणजेच तुझ्याशी नेहमी चांगले वागायचे, असं सांगितले,
येत्या रविवारी सकाळीच गण्या समुद्रावर गेला, खूप हिंडला मासे ,शिंपले ,चिंबोरी पकडली, दुपारी घरी आला, आजीने कौतुकाने गालावरून हात फिरवला, गाण्याने आंघोळ केली. मास्तरानीच जेवण दिलेल्या पिशव्या त्याने धुवून ठेवल्या होत्या, मास्तराकडे काम करताना गण्या खुपच चांगल्या गोष्टी शिकत होता, दोन पिशव्या घेवून मोठे मोठे मासे चिंबोरी त्याने दोन पिशव्यात भरले, मास्तरांनी दिलेले स्वच्छ थोडे ढिले कपडे घातले आणि आजीला मी सांजच्याला येतो सांगून निघाला, पहिल्यांदा त्याने मास्तराकडे पिशवी दिली, आणि घाईघाईत मित्राकडे जायला निघाला, मास्तरानी त्याला घरी जाताना इथे येवून जा सांगितले, गण्याने होकार देवून, मित्राने सांगितलेल्या खुणा शोधत शोधत त्याच्या घरी पोचला, मित्र बाहेर वाट पहात होता गण्याला पाहून खुष झाला कारण गाण्याने त्याला फसवले नव्हते. त्याने त्याला घरात बोलावले व तो आईला बोलवायला गेला,गण्याने पिशवी मित्राच्या हातात दिली नी तो मित्राचे घर न्याहाळू लागला, त्याचे घर फारच सुबक सुंदर होते, मित्राच्या आईने त्याला खाऊ दिला घरातले काहीबाही बांधून दिले आणि एक रुपया दिला, गण्याच्या तोंडातून एवढे हा शब्द नकळत निघाला, मित्राची आई असू दे तूला खाऊ साठी म्हणून म्हणाली. आणि गण्याला आई ही खूपच चांगली कुणीतरी बाई असते हे कळलं, गण्या धूम ठोकत पळाला अचानक मास्तरांनी घरी बोलवल्याचं आठवलं गण्या मास्तराकडे गेला, मास्तरानीच सराईतपणे चार आणे,व इतर काहीबाहि दिले, गण्या खुपच खुष झाला.
गण्या आता शाळेत, मास्तर गणित शिकवताना बारकाईने लक्ष देवून शिकू लागला, कळत नसेल तर मित्राला विचारू लागला त्याच्याकडे जमलेले पैसे किती आहेत ते गणित त्याला चुकवायचे नव्हते. गण्याला आता पैसा कळत होता.
क्रमशः
वर्षा पाटील ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा