पैका(पैसा) भाग 4

 गण्या आता नियमीत सुट्टीच्या दिवशी, उधाणाला  समुद्रावर जावू लागला, मासे धान्याच्या  बदल्यात  न देता पैशाच्या बदल्यात देवून व्यवहार करू लागला, एकदा आपल्या मित्राच्या  घरी मोठा मासा घेवून जात असताना एका माणसाने त्याला अडवले, आम्ही इतके जवळ रहात आसताना  दूरवर त्या साहबा कडे मासे विकायला कशाला जातोस? त्याने  त्याला दम देवून पिशवी उघडून पाहीले गण्याला  तो मासा मुळीच द्यायचा नव्हता,  त्या माणसाने त्याची किंमत विचारताच दोन रूपये सांगितली आणि एक पैसाही कमी घेणार नाही सांगितले, इतका ताजा मासा पाहून त्या माणसाने लगेच गण्याला दोन रूपये दिले, गण्याला  आता तो मासा मित्राला देता येणार नव्हता, 

गण्याला त्याचे खुप वाईट  वाटले.   गण्याला व्यवहारात खूपच फायदा झाला त्याने अर्धे पैसे आजीला देवून अर्धे स्वतःजवळ  ठेवले  बर्‍यापैकी  पैसे जमल्यावर  आठवड्याच्या   बाजारात जाण्यासाठी  गण्या आजीच्या  मागे लागला, आजीलाही खूप काही घ्यायचे होते. 

आठवड्याच्या बाजार गण्यासाठी अलिबाबाची गुहा होती, इतकी सजलेली दुकाने त्याने  कधीच पाहीली नव्हती. आजीला ताडपत्री शिवायला सुई, नायलाँनचा धागा,,माती खुरपाला खुरपणं, कंदिलात भरायला तेल, वात इ़  घ्यायचे होते

गण्याला चिंबोरी  पकडायला चिमटा,  हवा होता,  कारण मोठी चिंबोरी पकडताना त्याच्या हाताला  इजा होत असे. गरवण्यासाठी गळ, तुटू  नये म्हणून नायलाॅनचा धागा, आणि भरपूर मासे पकडण्यासाठी  जाळे दुकानातील रंगबेरंगी  दिवे पाहून गण्यचे डोळे दिपून  गेले, आजीबरोबर  सर्व खरेदी  करताना त्याला जागोजागी  मासेवाले  मासे  विकताना दिसत  होते आणि ताजी नसलेले मासे चांगले  पाच रूपयां पर्यंत  विकत  होते, गण्या  व्यवहार हिशोब तर शिकला  होता पण त्याच बरोबर  बाजारात कोणती वस्तू कितीला विकायची, त्याची किंमत  कशी ठरवायची ते त्याला  कळल 

आजीने एका दुकानात थांबून दोघांना दोन चपलाचे जोड घेतले साबणाची वडी घेतली साबण आणि चप्पल दोन्ही गण्या आयुष्यात  पहिल्यांदाच  वापरणार  होता. 

गण्याच्या डोळ्यात आता वेगळीच चमक होती.त्याला आता गावच्या बाजारात मासे विकायचे होते. पण त्या साठी तो शाळा सोडणार नव्हता ,समुद्रावरचं खोपट तसंच ठेवून गावातच मोकळ्या जागेत कुठे खोपट बांधता येईल का असा विचार त्याच्या मनात चमकून गेला  कारण   जाण्या येण्यात  त्याचा खूप वेळ जात होता...... 

गण्याला  मास्तरची मदत, आजीची माया, शाळेची शिकवण ह्याची  किंमत होती, पण त्याचा प्रामाणिकपणा, कष्ट करायची तयारी आणि कामाची चिकाटी, ह्याने  गण्यात सकारात्मक  माणूस घडायला मदत झाली. 

समाप्त 

वर्षा पाटील ©️®️🌹


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4