विदुषी

 ती टोलेजंग इमारती मधून बाहेर पडली, चेहर्‍यावर गाँगल चढवला आणि रस्त्यावर येवून टॅक्सीला हात केला,  टॅक्सी  एका भव्य  गोल्डस्मिथच्या दुकानाजवळ येवून थांबली, बर्‍याच  वेळाने ती बाहेर आली,थांबलेल्या टॅक्सीत बसली आणि टँक्सी,भरधाव वेगाने जावून एका पंचतारांकीत हाँटेल पाशी थांबली, टॅक्सी वाल्याशी थोडफार बोलून  तीने झालेलं बील चुकतं केलं, व तिथेच बसलेल्या फूलवाल्याकडून एक छानसा बुके घेतला .  लिफ्टमधून वर गेली, तिला सांगितलेल्या नंबरच्या टेबलपाशी आधीच कुणीतरी बसलं होतं तीने लुज पायघोळ पँरेरर,घतल होता, त्यावर लांब व्हाईट टाँप त्यावर लाईट पिंक कलरचा  कशीदा आणि राँयल पिंक  ओढणी घेतली होती, तीने दुरून स्मित केलं ,आणि टेबलजवळ बसलेल्या माणसाने तिच्या स्वागतासाठी उठून उभा राहीला, आणि जवळ येताच हस्तोंलदन केलं ,ती गोरीपान जवळ जवळ 5-'6"इंच उंची असलेली, कमळाच्या पाकळीसारखे डोळे असलेली,धारदार नाक लांबसडक बोट , लांब शेप  केलेली नेल्त्स , त्यावर फिकट गुलाबी रंगाच नेलपेंन्ट आणि करंगळी, अरंगळीत दोन्ही बोटात रिंग्स् तीने खुर्ची पाठी ओढली, आणि बसली, तिचा पेहराव जसा भारदार  होता तसंच तिचं व्यक्तीमत्व  ही आकर्षक  होतं. 🌹

त्याने मेनू कार्ड  घेतलं व दोन कॉल्ड  काफी आँर्डर केल्या, तिने हातातील गिफ्ट व बुके त्याला दिलं, त्याने एक स्माईल देवून  थँक्स  म्हंटलं, काँफी पिता पिता दोघांनी बरंच डिस्कशन  केलं, नंतर हसून परत हात मिळवून  तिने बाय म्हंटलं, तो तसाच बसून राहीला, त्याने वेटरला बोलवून काउंटरजवळ असलेल्या फुलदाणीत फुलं लावायला सांगितली,  व एक पेग रम आँडर केली. वेटरने थांबून म्हंटल sir,   this time ,really! do you want rum?त्याने नजरेच्या खूणेने जा म्हंटलं, त्याने अलगद गिफ्ट फोडलं, आतील बाँक्स  पाहून थोड गेस करायला, सुरूवात केलं, वाँच 90,%,सेकंड गेसिंग रिंग/ब्रेसंलेट,व तिसरं गेसींग कफींग पण जर रिंग असती तर तिने विचारलं असतं मी घालू का? त्याने बाँक्स उघडलं  आणि गोल्डन लायटर पाहून एक ***म्हणून  शिवी हासडली. राँयल ब्रॅन्डचे शिगारेट तोंडात ठेवले व नविन लायटरचा शुभारंभ केला.वेटरने आणलेल्या रमचे एक एक सिप घेत दूरवर नजर लावत विचार करू लागला, वेटरने सर ..वेटर काही बोलायच्या आत त्याने नो थँक्स  म्हणत जागे वरून  उठला लिफ्ट मधूूून आपल्या रूम मध्ये गेला आंघोळ करून परत एक सिगारेट शिलगावत हातात कँच करत किती  वजनाचं असेल ते पाहून 3-4तोळ म्हणजे 50-60हजार, ,***इससे महेंगा तो उसका लीप किसींग होगा,वोही दे देती. इतना महंगा गिफ्ट देनेकी क्या जरूरत थी. .

त्याने वेटरने जेवण विचारण्या आगोदरच नाही म्हटलं  व  परत एक शिगारेट शिलगावली. आज त्याने  तिच्याबरोबर लाँग ड्राइव्ह ला जायचे प्लॅन आखले होते, ते मनसुबे साफ कोसळले होते. विचार करता करता तो झोपी गेला. 


भाग 1

30/11/21

वर्षा पाटील ©️®️🌹



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4