पावसाळ्यातील एक दिवस: भाग २.
मी जे लेख लिहीते त्याच नावच आहे माझ्या आठवणातून, म्हणजे माणूस भूतकाळ जगू शकत नाही का? माणसाचा भूतकाळ जर वर्तमानकाळापेक्षा चांगला असेल तर नक्कीच ! तो परत एकदा आपला भूतकाळ पडताळून पाहू शकतो. !भविष्य आपल्याला माहीत नसल तरी त्याची चाहूल वर्तमानकाळात लागतेच, मग भूतकाळ हा अनुभवाची शिदोरी घेवून आपल्या पाठीशी उभा राहतो. तेव्हा मुळी आपल्या भूतकाळावर आपलाच हक्क असतो, जर तुम्हाला तो हवा असेल एखाद्या वाटाड्या(guide pole) सारखा!
कोकण कसं निर्सगाने बहरलेल, आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतं, पण जेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाची चाहुल लागते, तेव्हा आपल्याला आपल्या जन्म भूमीवर गर्व होतो. त्यावर कुणाचा हक्क सहन होत नाही वंसुधरा सर्वांची तर मग असे का? आपल्याला आपलं अस्तित्वही तेवढेच प्रिय असते आणि म्हणूनच जन्मगाव ही तेवढेच प्रिय.....
माझ्या गावाच्या पुर्वेला १० मिनिटं अंतरावर द्रोणागिरी डोंगर, हनुमान द्रोणागिरी पर्वत नेताना एक तुकडा (ढेपूळ)पडला व तो छोटासा तुकडा आमचा द्रोणागिरी डोंगर झाला. तेवढ्याच अंतरावर उत्तरेला अरबी समुद्र, सर्वत्र हिरवळ गच्च झाडी हा कोकणचा ठेवा..... आमचं सौन्दर्य!
पावसाळ्यात डोंगरावरून वाहत येणारे लहान मोठे झरे आमच्या गावात येवून मिळत व आमच्या गावातून त्याचे विरे वाहत जी वाट आम्ही उन्हाळ्यात रस्ता म्हणून वापरत असू तिच वाट पावसाळ्यात झर्यांचे ,धबधबे ,व मग मोठाले नाले म्हणून वाहतं. आम्ही त्याला विरा म्हणत असू . पूढे ते वहात समुद्राला जावून मिळत.
ढगांचा कडकडाट, विजांचा चमचमाट आणि धुवांधार पाउस हा मी माझ्या लहानपणापासून अनुभवला आहे. पाउस किती पडला हे उंचावर असलेल्या घराच्या किती पायर्या बुडाल्या ह्यावर अवलंबून असे मागचे दार खालच्या बाजूला पण आमच्या घरात कधीही पाणी शिरले नाही , कारण घराच्या बाजूची विहीर व खोलगट शेत ते पावसाचे साचलेले पाणि आपल्यात सामावून घेते.
एका वर्षी उन्हाळ्यात आमच्याकडे मोठाली झाडे तोडली,(ऐन),, आणि त्याच वर्षी धूंवाधार पाउस पडला, पाउस इतका की १०-१५फूटलांब व २-४फूच रूदींचे घेरदार ओंडके पाण्यावर तरंगू लागले, आणि बघता बघता जोरदार प्रवाहात वाहू लागले, सर्व गाव घरातील माणसे दोरखंड आणि मिळेल ते घेवून मोठाले ओंडके पकडायला सरसावले . एकही लहान मोठा ओंडका प्रवाहात वाहू दिला नाही, पार अर्ध्यागावापर्यतं वहात गेलेले ओंडके परत आणले. गाव लहान होता सर्वांचां शेती हा धंदा होता, आणि गावात एकी होती. परोपकार ही नियत होती. आणि अशा गावातल्या पाटलीणीची मी नात होती. हे पद पूढे आमच्या दूरच्या चुलत्यांकडे गेले . पण खूपसे लोक मला लहानपणी पाटलीणच हाक मारत.
एकदा गावातील सर्व मुलांबरोबर मी नेहमी प्रमाणे शाळेत गेली. जोरदार पाउस सुरू झाला होता. आजूबाजूच्या सर्व गावातील विरे वाहू लागले. धोक्याची सुचना शाळेला मिळाली व मुसळधार पावसामुळे शाळा लवकर सोडण्यात आली. मी २-३रीत असेन. अचानक शाळा सोडल्यामुळे माझा पेन्सिलचा मोठाला डबा(पूर्वी हिंगाची निळी लहान, मोठी डबी मिळत असे, त्यातील मोठी डबी) हातातच राहीला.दप्तर मी रेनकोट च्या आत पाठीवर घेतलं होतं. शाळा सुटल्यावर आम्ही गावातील मुल शाळेच्या पटांगणात एकत्र जमत असू. त्यातील ४ गाव मैत्रणींनी माझ्याकडे दोन दोन पेन्सिल मागितल्या. मी नकार दिल्यावर माझ्याशी कट्टी घेतली. मी भावाला न थांबताच एकटीच पूढे निघाली. व काही घरे पार केल्यावर , तिथून एकटीच जाताना विहिरीवर पाणि भरत असलेल्या आत्यांनी( वडिलांच्या मामेबहिणींनी) मला पाहिली. विर्यात पाणी जोरदार वाहत होते. .मी विर्यात पाण्याची खोली पाहण्यासाठी एक पाय टाकला. माझ्या पायाला माती लागली.( ती बाजूच्या किनारा ची होती) मी दूसरा पाय टाकला. पाण्याचा जोर एवढा होता की क्षणात मी पलटी झाले. माझ्या हातातील डबा पाण्यात पडला. मी झाडाचे मुळ पकडले व जोरात रडू लागले. मला दुख माझ्या पेन्सिलींच्या डब्याचे झाले होते. मी किती वेळ अस मुळ पकडून रडत होती. माहीत नाही. पण ती आत्या धावत आली. अंतर तसे बरेच होते. तीने मला पकडले व उचलून तिच्या घरी घेवून गेली. माझे कपडे बदलून मला तिच्या भावाच्या मुलाचा स्वेटर व हाफ पँन्ट घातली. गरम गरम चहा प्यायला दिला. भाउ व त्याचे मित्र रस्त्यातून जाताना त्याला हाक मारून घरचं वडिल धारी कुणी पाठवायला सांगितलं. आजी शिवाय घरात कुणीच नव्हतं.सर्व शेतावर गेले होते. शेजारी मोठी चुलत बहिण होती.तिचा मुलगा माझ्या एक वर्ग पूढे होता. ती पाणी ओसरल्यावर आली. तिने मला त्यांच्या घरपर्यंत उचलून आणले . व आमच्या मागील दारी सोडलं आकाश भरून आलं होतं. सर्वत्र अंधारून आलं होतं. आई शेतावरून आली नव्हती. मी व भाउ आजी जवळ चुली शेजारी वाट पहात थांबलो. आई आल्यावर आजी ने आईला उद्या त्या पोराचे कपडे परत करायला जा. व कशी विर्यात पडली ते विचार सांगितले........
मी चौथीत गेले व आमच्या कडे मोठी तेल कंपनी आली. तिने पाण्याचा प्रवाह वळवून ,विर्यातआमच्या गावात मुरूमाचा(पिवळ्या चिकट मातीचा प्रकार)नविन रस्ता बांधला.....
************************************************
माझं लग्न गाव ही खेड होत. माझी सासु हाँस्पीटल मध्ये अॅडमिट होती. व तिच्या सर्व सेवा करायला मी सकाळी जात असे. तिच्याबरोबर पूर्ण दिवस थांबत असे,दूपारी किंवा संध्याकाळी घरी निघून जात असे. माझ फील्ड(medical) तेच होत. त्यामूळे तिथे मला भिती वाटणार नाही . म्हणून माझी वर्णी.
मी नविन असल्याने मला त्या गावची नीट कल्पना नव्हती. त्य दिवशी ही धुवाधार पाउस पडत होता. मी नवर्याला फोन लावत होते. पण तो लागत नव्हता. सासुने लवकर घरी जा सांगितले. ट्रेन बंद पडली व कुठे अडकले तर... मी एस टी ने गावच्या वेशीपर्यंत पोहचले. पूढे पाणी भरले आहे. गाडी पूढे जाणार नाही कंडक्टर ने सांगितले. सर्व प्रवासी गाडीतून उतरले. बरेचसे त्याच गाडीतून परत फिरले. मी विचार केला परत जावून कुठे जाणार परत हाँस्पीटल ला किंवा नातेवाईकां कडे त्या पेक्षा गावातील काही लोक पायी चालत जायच्या तयारीत होते. मी पण तुमच्याबरोबर येते म्हणून त्यांना सांगितले. व त्यांच्या बरोबर चालू लागले, रस्त्यात प्रत्येकां बरोबर कुणींना कुणीं होते मी एकटीच चालत होते. रस्ता दुतर्फा शेते जलमय झाले होते. पाणी डेापरापेक्षा जास्त होते. पदोपदी पाण्यात वाहून जाणारे साप दिसत होते. एका ठिकाणी उंतरड व लगेच चढण असा खोलगट रस्ता होता. तिथे प्रवाहात पडण्याचा धोका होता. पाणी खोल होते. माझ्या जरा पूढे एक जोडपे हातात हात घालून सावरत चालत होते. मी तुमचा हात पकडू का? मी त्यांना आवाज दिला. कबंरभर पाण्यात त्यांच्या पत्नी चा हात पकडून मी तो रस्ता पार केला. चढणीवर थोड पाणी कमी होते . त्यांचे आभार मानून मी पूढील रस्ता झरझर चालू लागले....... घरी सासरे एकटेच होते. मला नळाचे पाणी भरायचे होते. थोड्या वेळाने दिर आला. रात्र झाली. नवर्याचा फोन आला. नवर्याला पाण्यातून गाडी(बाईक) घेवून येता आले नाही.व रस्त्याला लाईट नसल्याने त्याने मित्राचे घर गाठले. मी खूप विनवून सांगितले घरी ये. सोबत कुणीतरी भेटेल पण त्याला शक्य झाले नाही.त्याक्षणी तरी माझे म्हातारे सासरे व दिर(माझ्यासाठी देवासमान होते.)चांगले होते. आम्ही थोडा वेळ पावसातील अनुभवाच्या गप्पा मारल्या. मी सर्व काम आटपून ,काळोखात माझ्या रूम मध्ये कडी लावून झोपी गेले.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
समाप्त।.
Varsha Patil©®
9819406813
7:50pm
7/8/20
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा