पावसाळ्यातील एक दिवस


पूर्वी शाळेत १५ मार्काचा प्रश्न असायचा  ' निबंध" ज्याचा अभ्यासही न करता सहज लिहीता यायचं, कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त १० मार्क्स मिळवता यायचे. आणि हमखास पावसाळ्यातील एक दिवस हा विषय असायचा मग पावसाळ्यात धबधब्यावर ट्रीप,  गंमती जमती लिहायचे आज मीही पावसाळ्यातील एक दिवस लिहीणार आहे. २६ जुलै ह्या नंतर कित्येक पावसाळे येवून गेले पण लोक मात्र २६ जुलै विसरू शकले नाहीत..... त्या दिवशी लाखोंची पोशिंदा असलेली मुंबई अचानक पाण्याखाली गेली. आणि कित्येकांचे  घर संसार मोडून गेली........ 

 पावसाळ्यातील सगळ्याच दिवसा सारखा तेाही दिवस उजाडला २६ जुलै सकाळ पासून पावसाची रिपरिप चालू होती मुंबई कर ८,९,१०,वाजताच्या ड्युटीवर हजर होण्यासाठी निघाला, मीही त्याच वेळी घर सोडत असे पण, काही कारणास्तव अचानक कामाची सुट्टी घेतली. मुलगी झोपली होती आज पाळणा घरात न्यायची नव्हती, म्हणून मी काम करत बसली बाहेर पावसाचा जोर वाढत होता. सकाळ पासून लाईट नव्हती. सुट्टीच्या दिवसात घरातील सर्व आठवडाभराची कामे पूर्ण करायची संधी मिळाली होती. टिव्ही बंद होता. चवथ्या मजल्यावर  पावसाचा अंदाज येत नव्हता, अचानक खिडकीतून खाली पाहील रस्त्यावर पाणी दिसले. आम्ही रहात होतो तो भाग उंच सखल होता त्यामुळे रस्त्यावर पाणी मुळीच नाही. मग पाउस जरा जास्तच पडला का? मनात प्रश्न निर्माण झाला. घरात दोघां(नवरा व मी) मिळून एकच मोबाईल होता. Office मध्ये बरेच फोन असतानासुद्धा status त्या नावाखाली तो त्याच्याच खिशात होता. 

खाली जावून पहाव मनात विचार आला. तोपर्यंत ४ वाजले होते. मुलीला उचलून चार माळे चढ उतार करताना माझी दमछाक होई. पण फोन करून पहायचा म्हटलं तर नाईलाज होता. छत्री , पर्स, मुलगी घेवून खाली उतरले पाहते तर रस्त्यावर भली मोठी गर्दी  पाय बुडतील एवढे पाणी, जवळच गादीवाल्याच  दुकान होतं त्या दुकानातील काका बोलायला खूपच चांगले होते. त्यांनी सांगितले जवळ जवळ सर्व मुंबईत पाणी भरलंय,  ट्रेन बस सेवा विस्कळीत झालीय. लोक कामावरून परतलेत आता मात्र मी अशी वेंधळी कशी राहीली मला घरी पाण्याचा अंदाज आला नव्हता मी त्यांच्या फोनवरून फोन करून पाहीला. अर्धा तास फोन  करत होते पण फोन लागत नव्हता मग ते काका म्हणाले आता मीही दुकान बंद करून घरी चाललो. टेलीफोन बुथपा़शी गेल्यावर एवढी मोठी लांबलचक  लाईन, परत घरी आले.  राहीलेली काम आटोपली बाजूला काही फोन आला आहे का चौकशी केली. त्यांचाही फोन बंद पडला होता. त्याही घरी काका एकटेच होते.त्यांची तिन्ही मुले घरी आली नव्हती. व बायको मच्छी विकायला जात होती.तीही परत आली नव्हती. मनात म्हटलं कशी बुद्धी झाली काय माहीत आज सुट्टी घ्यायची पण मी माझ्या मुली सोबत होते. शेजारी एकटी राहणारी मुलगीही आली नव्हती. परत लाँक लावून खाली उतरले नंबर येईपर्यंत रांग सोडायची नाही. १तासाने नंतर,नंबर लागला. वातावरण पावसातही  गरम होतं आजूबाजूचे लोक रस्त्यावर गप्पागोष्टी करत होते. लाईनवाले ओरडत होते. लोकांच्या बोलण्यातून माहीती मिळत होती. कुणी एखादा कामावरून परतलेला असेल तर रस्त्यात थांबवून त्याच्या कडे चौकशी करत होते. लोकांच्या घरात पाणी भरले होते रस्त्यावर ही गुडघाभर पाणी झाले होते. माझा नं आला, मो. नं लागला नाही. मग  officeनं लावून पाहीला रिंग येत होती पण कुणीही उचलत नव्हते.  सिक्युरिटी नं try केला. तो उचलला गेला. त्याने सांगितले पूरा office १२ बजेही खाली हो गया. मी सांगितले परत जावून पहा hold करून तो परत गेला. परत आला. अंदर कोई नही है, मैने अभी office भी लाँक किया है, त्याने फोन ठेवला. मी परत घरी माहेरी फोन लावला. आई ला माझी काळजी लागली होती मी कामावर न जाता घरी मुली जवळच आहे म्हटल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. भावाने इतर कुठे जावू नकोस नीट दार लावून घे सांगितले.आमचा प्लँट भाड्याने असला तरी मोठा होता. दोघीच घरी आणि मोहल्ला, आमच्या समोरच्या बिल्डिंग मधील ग्राउंड प्लोअर वर आमच्यासारखे च मुस्लिम कुटूंब रहात होते, ते पती पत्नी फोन करायला आले कर्मठ मुसलमान, एक बिल्डिंग सोडून फोन करायलाही ती पूर्ण डोक्यापासून बुरखा घेवून आली होती. फक्त तिचे डोळे त्यातून दिसत होते. ती अतिशय सुंदर होती.   मी तिच्या कडे पाहीले  तीने विचारले फोन चालू है क्या? मी हा,है बोलली.आणि सहज तिच्या नवरर्याकजे पाहीले, तो माझेच निरीक्षण करत होता. नजरा नजर होताच सरकऩ भिंतीची लहर माझ्या अंगातून उमटली. मी जे लपवत होते ते लगेच त्यांना कळले. मी लहानगी सोबत आज एकटीच आहे व नवरा घरी आलेला नाही.  मला contact करायला काही साधन नव्हत काही निरोप नव्हता.  मी घरी आले बेचैन झाले अनेक घटना खाली ऐकायला मिळाल्या होत्या. घरी येवून मुली साठी वरण भात केला तिला . रात्री चे आठ वाजून गेले होते. जिन्यात किर् काळोख होता,  घरात मेणबत्तीच्या उजेडात मुलीला भरवले. परत शेजारी चौकशी करायला गेली तर त्यांची आई दोन लहान मुली व नवरा बायको एवढी माणसं घरी घेवून आली होती. पावसात त्याचया घरात पाणी भरलं होतं  रहायला जागा नाही म्हणून.  भिंतीची दुसरी कळ माझ्षा छातीत उमटली, जवळ मुलीचे पाळणा घर होते. तिथे जावून पहाव म्हटले तर काळोख झाला होता. शेजारी मावशीला म्हटलं माझ्या घरी येता का? सोबत तर ़घरात एवढी माणसं आणली कशी येवू? परत ९:  वाजता खाली उतरले दोन बिल्डिंग सोडून मुलीच्या पाळणा घरातील काका काकू कडे गेले पण बिल्डिंग मध्ये काळोख पायर्यांचा अंदाज येत नव्हता,पाय ठेवता येईना, पावसाची मजा पाहत दोन बहिणी  चाळीत बसल्या होत्या त्या टाँर्चच्या बरोबर खेळत होत्या.त्यांना म्हटलं जरा इथे उजेड दाखवा  तश्या त्या धावत बॅटरी घेवून आल्या. मुलीला घेवून जाता येता ओळख झाली होती.त्या मुलीला ओळखत होत्या. मी  जोशी काकांकडे गेली. त्यांची ही मुलगी आली नव्हती. अगदीच तुला भिती वाटत असेल तर ये इथे आम्हालाही सोबत होईल त्यांनी  माझ्या मनातील मेख ओळखली. मी त्यांना म्हटलं आता ९ वाजलेत मी ११ पर्यत वाट  पहाते. व मग येते. त्यांनी बर म्हटलं घरी येवून सर्व भांडी वगैरे काम आवरलं एक मन घरीत वाट पाहू म्हटलं पण मग विचार केला अर्ध्या रात्री दरवाजा ठोठवला, आवाज देवून वाजवला तरी आपण उघडू शकत नाही. त्यापेक्षा न थांबलेल बरं त्या दोघांनाही सोबत होईल.बाजूच्यी मावशीला मी मुलीला घेवून जोशी काकांकडे जाते.आलाच तर तसा निरोप द्या सांगितले. ११वाजता खाली उतरले रस्त्यावर वर्दळ होती. पण ती गल्ली सामसूम होती. परत एकदा सासरी, त्याच्या मित्राकडे,, माझ्या जवळच रहात असलेल्या मावशी कडे फोन करून पाहीला. मावशीच्या भागात पूर्ण पाणी भरले होते. कुठेही फोन लागला नाही. मग मात्र मी घरी न जाता जोशी काकांकडे गेले मुलगी झोपी गेली. आम्हाला झोप येणे शक्य नव्हतं त्यात लाईट नसल्याने खूप मच्छर होते.  वर खाली करन मी थकले होते. शरीराने व विचार करून मनानेही....पहाटे ५ वाजता माझा डोळा लागला.७ वाजता धडपडत उठले मुलीला दुध घेवून येते म्हटलं, दिड तास लाईन मध्ये उभे राहून दूध घेवून आले तर काका मुलीला घेवून घरी गेलेले, त्यांना वाटले मी घरी गेले. मला जिन्यात भेटले. म्हटलं तुम्ही त्रास कशाला घेतलात. चार जिने चढून यायचा कारण तसे ते वयस्कर होते. काका स्वभावाने व मनाने अतिशय चांगले होते. काकू दिसायला सुंदर पण थोड्या कडक होत्या. थांबले नाहीत ,मुलगी बाजूला ठेवली म्हणाले. मी मुलीला घेतलं. म्हणाले-- मी पण दुधासाठी लाईन लावायला  जातो. पाउस घरात थांबला होता, घर, नाती, उध्वस्त करून गेला. नवर्याने अनेक कहाण्या सांगितल्या कसे बिस्किटे खावून रस्त्यावर कबंरभार पाण्यात अडकलेा ते सांगितले. मला खर काय खोट काय?शोधायची गरज भासली नाही. , पण मुबंई मदतीला एका पायावर तयार असते.हे प्रत्येक माणसाच्या वागणुकीतून अनुभवले. आज त्या गोष्टीला १५ वर्ष झाली. त्यानंतरचा पावसाळा आम्ही मी व मुलगी तसाच अनुभवतो. तारीख वार वेगळा पण दिवस तसाच..... 

काळोखकुट्ट अंधार, बाहेर जोरदार पाउस, आणि आम्ही घरी दोघीच ! झोप येत नाही. आणि मच्छर झोपू देत नाही. फरक हाच की आता आम्ही कुणाची वाट पहात नाही. आणि सोबत म्हणून कुठल्या काकाकाकूंचया घरी जात नाही आजही बाहेर २६ जुलै चा पाउस पडत आहे आणि मी पावसाळ्यातील एक रात्र लिहीत आहे..... 


क्रमश: भाग १

 Varsha Patil©®

9819406813

2:00 am

6/8/2020

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4