प्रेम
मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रेम म्हणजे काय असतं तुमचं आमचं सेम असतं म्हणून लहानसा लेख वाचला मला त्यात न्यूनता जाणवली. प्रेमाच्या माझ्या कल्पना त्याहून वेगळ्या..
ही काय प्रेम करायची वेळ आहे? प्रेमावर लिहायची वेळ आहे का? तर! प्रेमाला गंध, वास ,वय, भूक, तहान हे काहीच नसतं जर काय असेल तर निव्वळ अनुभूती (फिलिंगस्). त्याला व्यक्त करताना निरनिराळ्या माध्यमाचा वापर करतात. जसं फुल त्याच देखणे पण, त्याचा स्पर्श, त्याचा गंध मनाला मोहवून जातो व त्यातून मनातील भावना व्यक्त होतात. ते फूल किती अलवारपणे आपल्या भावना वाहण्याचे काम करत. फूल मग ते कोणतेही असो.!
मला प्रेमाबद्दल काही बोलायचे असेल,,,,,तर लहानपणी शाळेतील कवितेतील एकच ओळ निशब्द करते, प्रेम कुणावरही कराव, गाईच्या नेत्रातील अथांग कारूण्यावरही करावं.!
गाईच्या डोळ्यातील भाव, गाईचे नेत्र किती मोठे काळेभोर ,! त्या पाणीदार डोळ्यात जे कारूण्य, जे प्रेम जाणवतं ते तुम्हाला कुठेही सापडणार नाही, ती कविता मी शिकली आणि नंतर मी फक्त गाईचे डोळे निरखू लागले. ते कारूण्य, प्रेम मला नंतर कुठेही सापडले नाही. पण डोळ्यातील तो काळाभोर भावनेचा डोह, विसरू च शकत नाही.
मला एकदा कामावर माझ्या सिनियर मँडम ने तूला मोकळा वेळ आहे तर आपण एखादा टाँपिक डिस्कस करूया म्हटलं, मी अभ्यासाचा, कामाचा, एखादा टाँपिक डिस्कस करण्यापेक्षा प्रेम ह्या टाँपिक वर डिस्कशन करूयात का? विचारलं म्हणजे आपल्या जिवनाचे सारच जर प्रेम असेल तर बाकी काही डिस्कशन कशाला करायचं? , त्या फ्रेंडली होत्या म्हणून काही बोलल्या नाहीत. त्यांनी ते बोलणं,हसण्यावारी नेलं,
प्रेम ही कवि कल्पना आहे.लोक एक नाही हजारो कविता प्रेमावर करतात. पण प्रत्येकाचे अनुभव,भावना, आणि प्रतिसाद मात्र वेगळा!
मी पाचवीत गेले तेव्हा मी इंग्रजी ची अक्षर ओळख शिकली. तशी मला ४थ्या वर्षी इग्रजी मिडीयम मध्ये टाकणार होते म्हणून शिकवली होती. मग ४थीत अगोदच तोंडओळख असावी म्हणून रटवून घेतली होती. पण पाचवीत ,तेव्हा मी एक नविन शब्द व नविन चिन्ह शिकले love म्हणजे प्रेम व ते लिहीताना heart ❤ सारखे चिन्ह लिहायचे. मला काही तरी नविन शिकल्याचा, गवसल्याचा आंनद झाला. त्यात नविन काही नव्हते फक्त मी नविन भाषेत प्रेमाला काय म्हणतात ते शिकले होते. पण तो शब्द गवसल्याचा आनंद शब्दादीत.
प्रेम म्हणजे काय? प्रेमाच्या व्याख्या ह्या अनेक कवी लेखकांनी वेगवेगळ्या केल्यात. काहीनी, प्रेम म्हणजे भावना, काळजी , त्याग,समायोजन, कारूण्य आणि मुर्ती मंत वात्सल्य जे आई आणि तान्ह्या बाळात असते, ते प्रेम!
काहींची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मोठमोठी गिफ्ट्स देवून, स्वत:ला जखमा करून, जीव देण्याची धमकी देवून, किंवा जीव देवून,एखाद्याचा जीव घेवून एखाद्ये खडतर व्रत करून, वैराग्य स्विकारून, किंवा स्वत:ला वेदना देवून..... किंवा समोरच्याला वेदना देवून........
एकदा एक सुंदर ,अनुरूप ,प्रेमी युगुल तुटले.मुलीचे अगदीच साध्या तरुणाशी लग्न झाले. प्रेमवीराला काहीच करता आले नाही. तो निराश तरूण तिथून निघून गेला. कालांतराने तिच्या नवर्याला त्याच्या पत्नीच्या प्रेमाविषयी कळले. व आपले साधे रूप तिला आवडले नव्हते. हे कळल्यावर तो तिचा छळ करू लागला. त्याचा मानसिक व शारीरिक छळ असह्य झाल्यावर ती नवर्याला सोडून माहेरी परतली.प्रियकर, व प्रेयसी दोघांनी परत एकत्र येण्याचा प्रयत्न केला. तो विफल ठरला. काही नतद्रष्टांनी तो हाणून पाडला. ते दु:ख सहन न होवून त्या प्रेमविराने लग्न केले. तिच्या नवर्याहून कुरूप दिसणार्या मुलीशी! पण त्याने आपल्या पत्नीला मारले नाही.किंवा तिचा छळ केला नाही. हे कोणते रूप होते स्वीकृती चे प्रेमाला दिलेली एक उपमा! पण तो एवढ्यावरच थांबला नाही त्याने आपले कुरूप पत्नी बरोबरचे फोटो प्रेयसीला पाठवू लागला की जे पाहून तिला दु:ख होईल. हा अगदी प्रेमाचा क्लिष्ट प्रकार वेदनेचा !
काही जण एखाद्या व्यसनात इतके चूर होतात. की त्यांच्या अस्तित्वाचा लवलेशही जाणवू नये. काही कफल्लक होतात. लहानपणी मी ज्या ❤चा उल्लेख केला होता त्या रक्तबंबाळ heart 💖💔💔तुटलेल्या, राख झालेल्या भावनांचा वेदनेचा हा प्रकार प्रेमात पहायला मिळतो.
प्रेमावरचे प्रत्येक भाषेतील चित्रपट तुफान चाललेत जसा की एक दूजे के लिए,, सिलसिला, देवदास, इ.काही पिश्र्चर मध्ये एकदम फाडू आयडीया असते प्रेम जिंकण्याची! व्हीलनला लोळवून प्रेयसीच्या मन जिंकण्याची! ह्या क्लृप्त्या मुल आपल्या खर्या जीवनातही वापरतात कधी जिंकतात कधी हारतात!
काही जण आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावरच चिडतात, त्याचाच राग राग करतात त्यांना आत्मघातकी इजा करतात. अति काळजी करतात.त्यांना नको असतानाही जबरदस्तीने भेटवस्तु देतात. हाही प्रेमाचाच एक प्रकार पण विकृत प्रेम! आपलेपणा वाटण्यापेक्षा तिरस्कार वाटावा असे प्रेम.
प्रेमात लोकांना आत्मघातकी प्रकार का सुचतात. भावनांचा उद्रेक बाहेर काढण्याचं ते एक माध्यम असतं.
प्रेम, प्रेम असतं ,तूमच आमचं सेम नसलं तरी! जिवनाच ते सार असतं! जीवनाचा तो एक अविभाज्य भाग असतो. हसत खेळत कधी नकळत ओले डोळे पुसत स्वीकारायचा असतो
❤🧡💛💚💙💜🖤💔💕💞💓💗💖💘💝💟🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Varsha Patil ©®
9719406813
3:45am
5/8/20.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा