खंड १ला टाईम मशीन भाग:७
कपील मुनींचीं क्षमा मागून गंगाजल शिंपडून ते सर्वच्या सर्व भाउ जिवंत करू शकत होते. म्हणजे च थोडा काळ मागे जावून टाईम ंंमशीनच्या सहाय्याने भावांना जिवंत करू शकत होते पण त्यापेक्षा महाभयंकर असा उत्पात होवू शकतो हे माहीत असून सुद्धा स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणायचे ठरविले. अर्थात टाईम मशीनचेच हे उदाहरण आहे.ह्यात घडलेले टाळले नसले तरी त्या पितरांना मोक्ष देण्यासाठी त्यावर उपाय शोधला आहे. टाईम मशीनचा उपयोग हा अपवादात्मक व दुसरा काही उपाय नसेल तरच होत असे. शापातून मुक्त करणे , परत माणूस जिंवत करणे ही टाईम मशीनची उदाहरण आहेत ऐतिहासिक काळी असे बर्याचदा घडत असे. परंतु ६० हजार भावांना जर जिंवत केले असतं तर मृत्युला काही किंमत राहीली नसती. लोक उठ सुठ प्राण वाचवायला टाईम मशीनचा उपयोग करत सुटले असते. आणि अनर्थ घडला असता.आत्मा अमर आहे, तो नश्वर देह त्यागतो, व नविन शरीर धारण करतो. त्यामुळे ते आत्मे मुक्त होणे गरजेच होते़
ऋषीच्या शापातून अहिल्या शिळा होवून पडली कित्येक वर्ष ती तशीच पडून होती रामाच्या स्पशाने तीला परत स्त्रीचा जन्म मिळाला व नंतर मोक्षप्राप्ती होवून ती स्वर्गात गेली. आता रामाचे आगमन हे टाईममशीनचे उदाहरण आहे की त्यात परत मागे जावून चुका सुधारणे . व जिंवत करणे हे होते. इथे ती एकटीच होती व तिला मोक्ष देण्यापूर्वी जिंवत करणे गरजेचे होते कारण तिचा देह तसाच होता. तो नष्ट झाला नव्हता व तिथून रामाचे गमन होईल तेव्हाच ती शापातून मुक्त होईल असा उपशाप होता. अशी खूप सारी उदाहरणे आपल्या प्राचीन इतिहासात आहेत.
पण काही ठिकाणी टाईम मशीनचा अजिबात विचार केलेला दिसत नाही.
उदाहरण द्यायचे झाले तर व्यास मुनी व गौतमीचा पुत्र अश्र्वथामाचे देता येईल. कारण ३००० वर्षाने अश्र्वथामा शापमुक्त होणार होता. पण ५००० वर्ष झाली तरी त्याला शापमुक्त केले गेले नाही , कारण त्याने महाभारतातील दुसरी पिढी जी सर्वावर उपाय होती ती अतिशय क्रूरपणे नष्ट केली अर्थात त्यामुळे पूढील सर्वच्या सर्व( इतिहासच बदलून गेला) घटनाक्रम बदलला. काही चुकांना क्षमा नसते. कारण त्यावर काही विचारच केलेला नसतो व त्याचे पडसाद अनंतकाळपर्यंत तसेच राहतात. काही काळाला आपल्या हातात घेवून बदलू इच्छितात अश्र्वथामा त्यापैकीच एक होता.
(क्रमश ७)
खंड १समाप्त.
भाग ७ समाप्त.
वर्षा पाटील.©®
लोणी काळभोर.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा