खंड। १ ला टाईम मशीन भाग:६
माणूस जेव्हा तारुण्यात असतो तेव्हा तो आपल्या प्रगती साठी दूरवर जातो, एकदा हवी तशी प्रगती झाली की पुन्हा त्याला आपल्या गावचे वेध लागतात. त्याला पुन्हा विश्रांतीसाठी आपलं मूळ गावचं हवं असतं, कारण त्याची पाळमूळ त्याच्या गावच्या मातीतच असतात.
माणूस अनादी काळापासून सतत शोधाच्या मागे लागला आहे. त्याला सतत नविन्याचा ध्यास लागला, पंरतु नविन शोधताना भारत हा असा देश आहे. त्याची मुळ पृथ्वीच्या चंद्राच्या उत्पती पर्यंत जातात. संस्कृती तर स्वर्ग आणि स्वर्गातून पृथ्वी वर आलेल्या गंगेच्या मुळापर्यंत , अक्षय तृतीयेच्या दिवशी भागीरथने गंगा पृथ्वीवर आणली पण ती स्वर्गातून सरळ पृथ्वीवर आली असती तर पृथ्वीवर ची सर्व जीवसृष्टी वाहून गेली असती, पण हिमालयात श्री शंकराने ती आपल्या जटेत धारण केली व अलगद पृथ्वीवर सोडली. कपील ऋषींच्या शापाने राख झालेले राजा सामंजस्य च्या ६० हजार भावांची राख गंगेच्या पाण्यात वाहून गेली व ते शापमुक्त होवून स्वर्गात गेले.
खंड १
क्रमश:भाग६
वर्षा प्र पाटील. ©®
लोणी काळभोर

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा