खंड १ला टाईम मशीन भाग :५
सरकार दप्तरी काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की एवढ्या बखरी/प्रत्येक घराण्याचं कुळ, मुळ वारस हे किती ही प्रत्येक गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर तंतोतंत राखून ठेवणे. खरचं कठीण, म्हणजे छोटीशी चूक सूद्धा एखाद्याच अख्ख कुळ बदलवू शकते. ह्यालाच सिस्टीम असे म्हणतात. मूल जन्माला आलं, की घर नंबर, पासून मुलाची सर्व माहीती दप्तरी जमा होते. ती एकदा का जमा झाली. कि त्याच्या पूढील कितीही पिढ्या, त्याची माहीती मिळवू शकतात. ह्या सिस्टीम मध्ये घोटाळा होता कामा नये. कारण एखादा अधिकारी नविन पदावर कार्यरत झाला. आणि त्याला कागदपत्रे हाताळताना काही माहिती अपूर्ण/चूकीची/गहाळ असा शेरा मारून पूढील तपासासाठी फाईल पाठवली आणि काही कारणाने त्या अधिकार्यांच बदली झाली. /ती फाईल दडवून ठेवली गेली की तो विषय तिथेच संपतो. काही वेळा भ्रष्ट अधिकारी अशा फाईल गहाळ करतात व तात्पुरत वेळ मारून नेतात. त्या कागदपत्रांचा जिथपर्यंत त्याचा मालक किंमत देत नाही,किंवा गरज पडत नाही. तिथ पर्यत ती सरकार दप्तरी धूळ खात बसते
सरकारी दफ्तरी असलेल्या नोंदणी चा उपयोग घराणे, जमिनीची खरेदी विक्री, जमिन नावावर करणे. कूळ शोधणे, एखादी व्यक्ती हरवल्यास तिचा शोध घेणे, शाळेचा दाखला, नोकरी साठी जातीचा दाखला,, जात पडताळणीसाठी उपयोगात आणतात अशावेळी सरकारी दफ्तरी जेवढी कामे स्वच्छ, तेवढा देशाचा कारभार स्वच्छ असं असताना सरकारी कामात भ्रष्टाचार का होतो?
वर्षा प्र पाटील. ©®
क्रमश:५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा