भेडीया 10
दोन दिवसानी दारावर टकटक टक झाली मुलीने दार उघडून पाहीले, दारात हवलदार होता, त्याने मुलीला सांगितले, कल आम्ही को घर मे रूकने के लिए बोलो, मुलीने हां म्हणून दार बंद करून आईने, धुवायला टाकलेले कपडे धुवायला गेली......
दुपारी तीच सोशल वर्कर आणखी दोन माणसं घेवून दारात उभी राहीली. नको नको म्हणताना, त्यांना चहा ठेवला, तीने मुलीला जवळ बोलावले परत तूला, जेवायला काय जेवतेस, दुध पडतेस का? नगमाच्या छोट्या मुलीने सोशल वर्कर ला आन्टी ये देखो करून आम्मीने आणलेले दोन फ्राॅक दाखवले, सोशल वर्करने, बाजूच् बसलेल्या हवालदारांकडून दोन बॅग घेतल्या, आणि त्या गुड्डूला जवळ बोलवत तीच्या हातात दिल्या त्यात एका मध्ये खूप सारा खावू होता, तो तुम्ही वाटून खा सांगितले. एकात नवीन तीन ,चार ड्रेस होते, नगमाला सांगीतले आम्ही हिच्या आईवडिलांचा शोध घेतोय, तीन चार महिन्यात मिळाले नाहीत तर, तीला आम्ही स्कूल मध्ये टाकू. आणि दर महिन्याला अशीच तीची खुशाली घ्यायला फेरी टाकू. जाताना नगमाला 1000/- देवून गेली. क्षणभर नगमाला आपण कपडे घेवून यायची उगाच घाई केली असे वाटले, तीचे ठेवणीतले पैसे तसे परत मिळाले होते. दोन्ही मुलींना आता नवीन आणलेले दोन्ही फ्राॅक तुम्ही घाला सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा