भेडीया भाग 9
Social worker ने नगमाला मुलीचा बाहेर बसायला सांगितले, सर्व जण गेलेले परत आले आणि त्यांच्यात जोरदार बहस झाली. आणि 1तासाने नगमाला सोशल वर्कर ने आत बोलवले, आणि सांगितले आम्ही खूप विचारांती निर्णय घेतलाय एक प्रयोग म्हणून आम्ही तुझ्याजवळ मुलगी ठेवायचा निर्णय घेतलाय पण जर तू मुली कडे दुर्लक्ष केलेस, तीचा छळ, मारहाण केली, तीचा दुरुपयोग केला.तीला मारहाण झाली. फसवणूक केली तर मग मात्र मुलगी काढून घेतली जाईल. नगमा आनंदली, तीने सर्व अटी मान्य केल्या. सांगतील तिथे तस सह्या केल्या, तिच्या नकळत तिने एक करार केला.
नगमा, गुड्ड़ूला घेवून घरी आली, संध्याकाळचे सहा वाजले होते अजून 3-4 तास तरी तीच्या घरची कुणी परतणार नव्हती. तीने दुध गरम करून गुड्डूला दिले, आपली ट्रंक उघडली. खोल तळाशी दडलेला रूमाल बाहेर काढला. आणि त्याची गाठ सोडली. त्यातील पैसे बाहेर काढले, 1000/- निघाले, धंद्याचा माल आणण्यासाठी, अडीच अडचणीला म्हणून ठेवलेले पैसे. निने परत रुमालात बांधले, आणि परत पायात चपला सरकवून तीने गुड्डूचा हात धरला दाराला कडी सरकवून ती बाजारात आली. एका कपडेवाल्याच्या दुकानांवर थांबली, आणि तीच्या मापाचे दोन दोन जोड घेतले, लहान मुलाचा चेहरा आठवून त्याला, एक जोड घेतला, दोन मुली मिळून एकच फ्राॅक घेवून, ती त्या दुकानातून बाहेर पडली. दुधपावडरचा एक डबा आणि बिस्कीट पुडा घेवून ती घरी आली. आणलेल्या पिशव्या कोपर्त टाकून तीने गॅसवर भाताचे आधण ठेवले. डाळ भिजत घातली. आणि लोणच्याची डबा खाली घेतला......
साडेनऊच्या सुमारास तिन्ही मुल बापाबरोबर परत आली. मुलला भरवून तीने झोपवून ठेवले होते. मुलगा दुध ,जेवणाशिवाय, येतानाच बहिणीच्या खांद्यांवर झोपला होता. तीने त्याला गुड्डू जवळ झोपावला.
जेवून झाल्यावर मोठ्यामुलीने पिशवी उघडली. मुलीला ड्रेस बघून धाकटी मुलगी जवळ आली. सर्व पिशवी उपसून तीला दोन बहिणीत एकच ड्रेस पाहिल्यावर, तीने तो ड्रेस लहान मुलीला दिला, आणि म्हणाली, वो जो गुड्डूको पहले आर्मीने नयावाला दिया वईच मेरा था , अब उसको नया लाया तो मेरा मुझे मील जाएगा.
आपली मुलगी फ्राॅक साठी न रडता, शहाणपण शिकवताना अकाली मोठी झालेली, बघून नगमाला वाईट वाटलं, पण आता मुलगी सगळ्याकडे जमवून घेईल, ह्या विचाराने बरं वाटलं....
नगमाने मुलीला सांगितले. कलसे मै, और अब्बू छोटी जायेंगे, लिंबोडा बेचने, तुम गुड्डू और रेहमान को लेके घरमेच रहो.लडकीने हां कहा.....और गुड्डू के बाजू मे लेट गयी...
क्रमंश
वर्षा पाटील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा