शाळेला सुट्टी पडल्या की आम्ही द्रोणागिरी डोंगरावर दररोज जात आसू, आणि इतर वेळा शनिवार रविवार जात आसू, पावसाळ्यात गावातील आम्ही सर्व मुले भाजी खुड़ायला, जात आसू, नुकताच पाउस पडून गेल्यावर झालेली ओलसर भुसभुशीत जमीन, सुंदर हवाहवासा वाटणारा मातीचा गंध, पाण्याचे ओहळ, आणि एक निसर्गाची निरागस मनाला लागलेली ओढ. हा एक ऋणानुबंध होता त्या नकळत्या वयात द्रोणागिरी डोंगराशी. सुट्टीत आई वडिलांचा हाथ धरून आम्ही डोंगरावर जाताना एक विश्वास असायचा, त्यांनी सांगितलेल्या शिवरायांच्या कथेने छोट्या पावलांना तो डोंगर चढताना स्फुरण येत आसे. दररोज जाण्यामागे आमची द्रोणागिरी च्या पायथ्याशी वडिलोपार्जित शेतजमीन होती. भला मोठा धबधबा आमच्या शेताच्या बाजूने डोंगरावरून कोसळत आमच्या गावातून जात होता. आम्ही त्याला वीरा म्हणत आसू. त्याच रूप तर अवाढव्य होत, पण तो वाहताना, कड्याकपारीतील झाड पान , दगड,धोंडे, गुरे ढोरे, माणसे सुद्धा, घेवून वाहत असायचा, आणि गावातील लोक माणुसकी म्हणुन ते एकत्र जमून...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा