कर्नाळा ट्रीप:-
सकाळी 8:30 वाजता घरातून मी माथेरान साठी निघाले.जरा उशीरच झाला,पण संध्याकाळी परतीचा प्रवास करून रात्री 10,
-11वाजता घरी पोहचले तरी चालेल.ह्या विचारात सव्वा दहा वाजता पनवेलला पोहचले. मी 6सिटर कडे धाव घेतली.चौकफाट्याहून शाॅर्टकट्स वगैरे घेवून कर्जतला जायचे. पण रिक्षावाल्यांनी असे काही शाॅर्टकट्स नाहीत सांगितलं, मग मी माझा मोर्चा रेल्वेस्टेशन कडे वळवला.टिकीट खिडकीत चौकशी करूनही त्याने मला कल्याण मार्गे तिकीट दिले, एवढा वळसा घालुन जायचे म्हणजे, मी स्टेशनमास्तरकडे चौकशी केल्यावर पूणा डायरेक्ट संध्याकाळी साडेचारची आहे सांगितले,माझे तिकीट कॅन्सल करून द्या सांगितले ,पण त्याने नकार दिला.रिक्षेने मी पनवेल बस स्टॅण्डवर आले, तिथे एक तास थांबून 12:30ची कर्जत बस पकडली. शेजारी दररोज प्रवास करणारा काॅलेजचा मुलगा होता, त्याला कर्जत नेरळ शटल लगेच असते का विचारली. आणि माझ्या वेळेचा ताळमेळ चुकणार हे लक्षात आलं,माथेरानला भोज्जा करून परतावं लागणार हे समजलं, त्या मुलाला कर्नाळाला जायचं असेल तर कुठे उतरायचं, विचारलं आला त्या स्टाॅपलाच उतरा म्हणाला, पण मी दरवाज्यात पोहचेपर्यंत गाडी सुरू झाली, पुढच्या स्टाॅपला उतरून परत रिक्षा करून मागे आली. व त्या स्टाॅपवरून दुसरी रीक्षा करून कर्नाळा अभयारण्य पर्यंत पोहचले.सेंच्युरीपार्कचे वनविभागाचे 60/-रू तिकीट काढून चालायला सुरूवात केली.इतका वेळ काही खाल्लं,पिल्लं, नसल्याने मी पाणी पिवून चण्याची पुडी काढली.ते पाहुन खुपचं माकडे रस्त्यावर आली.मी थोडे थोडे चणे त्यांना टाकत ,आणि माझ्या मागे ते टिपत येवू लागली.गार्डन मध्ये मुले खेळत होती.पक्ष्यांच्या पिंजऱ्यात मोर लांडोर ची जोडी, काही रंगबिरंगी पॅरोट्स तर काही साधे पॅरोट्स इतकेच होते.
२०मिनटं रस्ता चालून झाल्यावर पाण्याची बाॅटल भरून थंडगार कोकम सरबत प्याली. महिला बचत गटाच्या हाॅटेलच्या महिलेला साधारण किती वेळ लागेल विचारलं, तिने दिड तास चढायला व तितकाच उतरायला लागेल सांगितले.
बरोबर एक वाजता डोंगर चढायला सुरूवात केली, व पायात सॅन्डल व हातात १०कि. वजनाची बॅग घेवून चढायला सुरूवात केली. मी चढताना मुलांचे घोळके खाली येत होते मी शेवटची चढणारी होते, कारण एक नंतर कुणालाही चढू देत नव्हते. वरती किल्ल्याचा दरवाजा बंद आहे, प्रवेश नाही म्हणून आम्ही अर्धवट किल्ला चढून परत आलो.असे काही मुलांनी सांगितले.वरती मोठाले दगड पार केल्यानंतर दोन रस्ते आहेत त्या पैकी आटलेला झरा सोडून दुसरा रस्ता गडाकडे जातो सांगितले मी परत चणे खायला काढल्यावर परत माकडे आली व एका लहान माकडाने माझ्या हातातून पुडी हिसकावली. मी माझी पाण्याची बाटली कदाचीत तहान लागली असेल म्हणून ठेवली, त्यावर माकडाने येवून त्यात काय आहे पाहीले आणि पाणी ओतून दीले. व परत दूर जावून बसला, मी कागद व रिकामी बाटली उचलून पुढे चढत राहीली, आता तिथे कुणीही सोबतीला नव्हते. तेवढ्यात पानात सळसळ वाजली पाहीले तर रणरणत्या उन्हात पानाआडून एक सरडा माझ्याकडे पहात होता. मी त्याला म्हंटले, लप लप खूपच कडक उन आहे.आता सकाळी गेलेले पर्यटकही परतीचा प्रवासातले संपले होते, वरून कुणीही खाली येत नव्हते. माझी गड चढण्याची उत्सुकता , जिद्द मला स्वस्थ बसू देत नव्हती.एकटी असूनही यत्किंचितही मनाला भिती शिवत नव्हती.एवढ्या वरती आपण एकटे आहोत ह्याचा विचारही मनात येत नव्हता, आणि अचानक लक्षात आले अजून वरती किती चढायचे आहे कळत नव्हते. झाडे एवढी रुंद व उंच होती की वरचा डोंगराचा भाग दिसत नव्हता समोर फक्त आकाश दिसत होतं. आणि झाडांच्या झरोक्यातून उन्हाचे कवडसे डोकावत होते. सर्व स्वच्छ व स्पष्ट दिसत होते. मोबाईल मध्ये वेळ पाहीली चढून दोन तास झाले होते तीन वाजले होते. अजूनही वरती चढावेसे वाटत होते. पाच वाजता गेट बंद होतो. उतरायला दिड तास वार्याची छान झुळुक अंगाला स्पर्श करून गेली. आणि मन उल्हासित झालं, मी परतण्याचा निर्णय घेतला. उतरताना हात धरायला कुणी नसल्याने मी पायातली सॅन्डल व बॅग थोड्या थोड्या अंतरावर फेकून झाडांची मुळे, ताने , त्याना पकडून खाली येत होती. काही ताने इतके जाड होते की त्यावर बसून झोपाळे घेवू शकतो.झाडाची बुध्यांची जाडी ८०-९०इंच इतकी घेरदार होती. पण उन्हामुळे निष्पर्ण झाली होती. फळांची झाडे चींचा, बोरे, फणस,पेरू चिकू सिताफळ असे एकही झाड नव्हते.दोन तासांच्या प्रवासात एकच आंब्याचे झाड दिसून आले. करवंदाच्या जाळ्या भरपूर होत्या पण तुरळक एक -दोन फुले दिसत होती.पाण्याचे दुर्भाष्य वाटत असले तरी पाण्याच्या टाक्या, व छोटेखानी तळे पहायला मिळाले होते,माकडांना पाणी मिळत होते. म्हणून त्यांनी माझ्या बाटलीतले पाणी ओतून दिले होते.फळाअभावी त्यांची उपासमार होत होती. निष्पर्ण झाडांमध्ये काही झाडांना नवीन पालवी फुटत होती.
मला भराभर खाली उतरायला एक तास लागला .अभयारण्यात २३४पक्षांची नावे आहेत पण मला मात्र मोजकेच ७-८प्रकारचे पक्षी पहायला मिळाले.जंगल घनदाट आहे,मोठाली ऐन,सांग,पळसाची असे वृक्ष आहेत,पण आंबा,फणस, वड,पिंपळ,ताड,माठ,ह्या झाडांची वनवा आहे.
हाॅटेलमध्ये भरपूर माणसे होती.मी उन्हाने रापलेला चेहरा धुतला, पाण्याची बाटली भरून घेतली.१मिसळ व ताक घेतले, मिसळ मधले पाव माकडांना घातले जवळच झाडावर कावळा बसलेला त्याला पाव घालून बघितला, पण त्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहीले नाही. महिलेने मला प्राण्यांना काही खायला घालू नका.
मी ३०रूपयाचे सहा पाव घेतले.मगाच्याच महिलेने , नियम तोडल्यास ५०००/-रू फाईन आहे सांगितले.मी तो नियम विषबाधा होवू नये म्हणून आहे. पण उपासमारीने देखील त्यांची हालत खराब आहे.म्हणाले व रस्त्यातून येताना सहा पावाचे तुकडे टाकत आले. बाहेर पावणेपाच वाजता पोहचले,तिकीट खिडकीवर ४०/-रू राहीले होते ते घेतले. व रिक्षेची वाट पहात चालत राहीले. मला रिक्षा मिळत नव्हती, थांबत नव्हती, एका मुलाने बस थांबते त्या गावापर्यंत लिफ्ट दिली, मी त्याचे आभार मानले.
पेण उरण बस पकडून उरणला घरी आले. अशा प्रकारे माझी ट्रीप पूर्ण झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा