फेरफटका

भटकंती हां प्रकार लहानपणी ,ऐन तारुण्यात असतोच पण संसाराच्या डबघड्यातून उसंत मिळाली की चाळीशी नंतर  माणुस परत भटकंतीला सुरूवात करतो.तसेच मीही सुरूवात करायचे ठरवले.३१डिसेंबरचे औचीत्य साधुन मी मुलीला हाॅस्टेलला भेटायला गेली १जानेवारीला माझा वाढदिवसा निमित्ताने महाबळेश्वरला जायचे ठरविले.आम्ही कॅब बुक केली.ऐन वेळी ठरलेल्या पेमेंट पेक्षा एक हजार जास्त मागितले. आणि आमची कॅब कॅन्सल झाली.व.ट्रीपही कॅन्सल झाली.पण मी हट्टाने जायचेच ठरविले.
आम्ही स्वारगेट हून सातारा बस पकडली.रात्रीचा झोपून प्रवास करून १:३० वाजता सातार्याला पोहचलो ,पण नुकतीच महाबळेश्वर बस गेली होती व दुसरं कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते.मोबाईल आणि पाॅवर बॅंक चार्ज करायला स्टेशन मास्तर कडून अनुमती घेवून तीथल्या प्लगवर जोडले.थोडी थंडी वाजत होती म्हणून दोन चहा घेवून प्यालो व भटक्या कुत्र्यांसाठी बिस्कीट पुडा घेतला. चार वाजता कॅब आली आणि आम्ही परत १तास प्रवास करून महाबळेश्वरला पोहचलो.
एक माणसाने आम्हाला तुम्हाला रूम दाखवतो चला म्हटलं व त्यांच्या पाठोपाठ चालत आम्ही गेलो.रूम नीटनीटकी पाॅश होती. वाॅश घेवून थोडावेळ आराम करून थंड पाण्यात अंघोळ करून तयार होवून खाली आलो. गरम गरम चहा पिवून रूम वाल्यांनी कॅब तयार ठेवली होती. त्यातून  महाबळेश्वरचा साईट सिंगचा प्रवास सुरू केला.प्रथम स्ट्राॅबेरी प्लॅंन्टेशन दाखवले. तिथे पेय पिवून मग  बोटींग साठी गेलो, तीथेच एक स्वता व्हलव्वत न्यायचे व दुसरे बोटमॅन सोबत जायचे  असे पर्याय होते. आम्ही दुसरा पर्याय निवडला.त्यांनी आमच्याशी छान गप्पा मारल्या. छान माहीती दिली. मोठ्या तळ्याला संपूर्ण फेरफटका मारला.त्या नंतर आम्ही पाचगणी फिरलो.थोडं फिरल्यानंतर एलीफंन्ट पाॅईंट फिरलो तिथे थोडं उन्हं जाणवत होतं,पण वाराही छान होता.खूप सारी माकडे इथून तिथे उड्या मारत होती.आम्ही तिथे बर्फाचा गोळा खाल्ला. तिथून पूढे एक्वॅरिअम पहायला गेलो.अमेझिंग छान मोठमोठ्या फिशटॅंक मध्ये इतके सुंदर मासे विहार करत होते. निसर्गाचे अद्भुत दर्शन इथे होते.निसर्ग आपल्याला सहज उपलब्ध होत नसेल तर माणसाने बुद्धीच्या जोरावर कसं त्याला आपल्या ओंजळीत बांधून ठेवलंय हे इथे पहायला मिळतं.हे पाहून मन अगदी उल्हासित होतं,.त्यापुढे वॅक्सचे स्टॅच्यु पाहीले.तेही खूप सुंदर हुबेहूब वाटणारे होते. आता 4डी ॲनीमेशन मन रोमांचित करणारी मुव्हमेंट एजाॅय केली.
आता मात्र खुप भुक लागली होती.खुपच छान आणि पाॅश रेस्टॉरंट मध्ये जावून जेवणावर ताव मारला. त्यानंतर आम्ही  जेली चाॅकलेट्स सरबत, ह्याची फॅक्टरी पाहीली.व तिथून खुप सारी खरेदी केली.  नंतर हाॅर्स रायडिंग करायला गेलो. खुपचं महागडं होतं पण मला हाॅर्स रायडिंग चा अनुभव घ्यायचाच होता.घोडे अतिशय मजबूत आणि मस्त होते. आलटून पालटून काळ्या व पांढऱ्या घोड्यावर आम्ही बसलो. सनसेट आणि बरेच पाॅईंट आम्हाला दाखवले, आता बरीच संध्याकाळ झाली होती.बाजार इतका भरला होता, खुप सारी खरेदी करावीशी वाटत होती. मुलीने रायफल शुट केलं, तीने 3बुलेट मध्ये सात फुगे फोडले,त्यावर तो माणुस एकदम खुश झाला.आम्ही कॅब जवळ आलो आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला, मध्ये खुपचं ट्रॅफीक मिळाली. पण सर्वत्र लायटींग गार वारे ह्याने थकवा कुठच्या कुठे पळून गेला. रूम वर आल्यावर सामान ठेवून परत मार्केट मध्ये फिरायला बाहेर पडलो.खूप सारख्या स्ट्रॉबेरी विकत घेतल्या. केक कापून वाढदिवस  सेलिब्रेट रात्री डिनर करताना करूयात असं ठरलं,पण  उद्या सकाळची बससाठीच्या चौकशीला गेलो असता रात्रीच साडेदहाला बस आहे कळल्यावर आम्ही लगेच रूम सोडायचा निर्णय घेतला.परत एकदा रात्री स्लिपर बसने प्रवास सुरू करून सकाळी 5:30 वाजता नवी मुंबईत पोहचलो.ख्रिसमस,31स्ट आणि वाढदिवस अशा प्रकारे सेलिब्रेट करून ट्रिपची यादगार सांगता केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4