page 1
दुपारचे दोन वाजले होते, मनोहर रावाने आपले किराणा मालाचे दुकान बंद केले, आणि भर उन्हात चालू लागले आता त्यांना पूर्वी सारखे कष्ट होत नव्हते. आणि तसे दुकान सांभाळायची गरज नव्हती पण नाईलाज होता. ते विचार करत स्वताच्या हवेली पर्यंत पोहोचले. पायर्या चढून, एक दीर्घ श्वास घेतला, खिश्यातून रुमाल काढून घाम पुसला, आणि समोर टांगलेल्या पाळण्यावर जावून बसले. आत ,लक्ष्मी म्हणुन आवाज दिला,...
त्यांची बायको, घाईघाईने पाण्याची घागर घेवून आली. त्यानी त्या थंडगार पाण्याने आपले, तोंड धुतले.. आणि हाताने थांब सांगितले, त्यांच्या बायकोने आपला डोक्यावरचा पदर नीट केला आणि थांबली. खर तर त्यांच्या मुलीचे नाव लक्ष्मी होते, आणि बायकोचे नाव लीला होते. मुलीचे लग्न होवून ती सासरी निघून गेली होती. तिच्या आठवणीने मनोहर ने आपल्या गाईच्या बछडयाचे नाव लक्ष्मी ठेवले होते. तो मुलगी झाल्या पासून बायकोला लक्ष्मीची आई म्हणुन हाक मारायचा. आणि गाईच्या बछडयाचे नाव लक्ष्मी ठेवल्या पासून लक्ष्मी नावाने घरात आवाज द्यायचा, की कोणी उपलब्ध आसेल तो यायचा...
मनोहरने आपल्या हातातील पिशवी उघडली .त्यातून नोटांचे पुडके बायकोच्या हातात देवून सांगितले, ही मुलाच्या कॉलेजची फी त्याच्याकडे दे. 4 गोष्टी त्याला सांगायला तो मला ना दुपारी भेटतो, ना रात्री, बायकोने प्रश्नार्थक नजरेने विचारले, 25 आहेत. 5 त्याच्या खर्चाला लागतील म्हणुन देवून ठेव.आणि वरचे 20 फी भरायची आहे.
बायकोने घागर उचलली, आणि आत गेली. मनोहर तिथेच काही विचार करत बसला.
सुखाचा संसार म्हणतात, तो त्याने केला होता, वडिलोपार्जित हवेली, आणि मोठे किराणा दुकान मुख्य बाजारपेठेत होते. वडिलोपार्जित प्रॉपर्टी त्यांना मिळालेली होती. कुटुंब मोठे असले तरी, तो त्याच्या आई बापाचा 6 बहिणींच्या पाठीवर झालेला एकुलता एक मुलगा होता, शिक्षण पूर्ण होताच नोकरी शोधत असतानाच वडील वारले. आणि दुकान सांभाळायचे काम त्याच्यावर आले. आणि वर्षभरात लग्न होवून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येवून पडली. आणि मग स्वताच्याच संसाराच्या जबाबदार्या पार पाडताना त्याला उसंत मिळाली नाही..
त्याला 5 मुले आणि 1 मुलगी, 6 वे आपत्य जन्माला, येई पर्यंत मोठा 16 वर्षाचा झाला, होता. आणि 4 वर्षाचा शेवटचा मुलगा शाळेत पाय ठेवत असताना, मोठा मुलगा पदवी होवून बाहेर पडला. सरकारी नोकरी लागून स्थिर झाला...
मनोहर आत हवेलीत शिरला. बायकोने स्वैपाकघरात जेवण वाढले होते, त्या पाटावर जावून बसला. दुकान नोकरावर सोडून, येण्याचा हा त्याचा दिनक्रम होता. थोडी विश्रांति घेवून त्याला 5 पर्यंत दुकानात जायचे होते....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा