सामाजिक बांधिलकी

खडबडीत रस्त्यावर बस थांबली. आणि  पाटील  खाली उतरले. सभोवताली हिरवळ पसरलेली होती. पाटलांचा नोकर हातात पिशवी सांभाळत पाटील काय निरखून पाहतात. ते पाहू लागला. पाटील यांच्या  चेहर्‍यावर स्मित हास्य पसरले. त्यांना थंड वार्‍याच्या झुळुकेने उत्साहित केले. ते तशाच खडबडीत रस्त्यावरून चालू लागले आणि मूक पणे त्यांच्या मागे चालू लागला. पाहता पाहता डोंगराळ भागातील चढण चढून पाटील एका झोपडीवजा घरा जवळ थांबले. त्यांनी बाहेरून जग्या म्हणुन आवाज दिला. नोकराने मागून परत आवाज दिला. आतून एक  बाई हाताला लहान मुलगा धरुन बाहेर आली. पाटलांना ओळखून लांबूनच नमस्कार केला. पाटलांनी जग्या आठ दिवस झाले कामावर  का आला नाही, विचारले, तिने पाटलांना बसायला पथारी पसरली. आतून जावून पाणी आणले. पण पाटीलांनी तिकडे लक्ष दिले नाही.परत त्यांनी तोच प्रश्न केला, आणि घरमालक आजारी आहेत, आतल्या पडवीत झोपलेत सांगितले. पाटलांनी नोकराला पहायला पाठवले. नोकराने खरोखरच जग्या अंथरुणावर झोपलेला आहे ते सांगितले. पाटलांनी आत जावून पाहिले आवाज दिला, पण तो खरोखरच झोपला होता, पाटीलला त्याच्या बायकोने तुमच्या कामाचा खोळंबा झाला आसेल, मी बरा झाल्यावर लगेच पाठवते सांगितले. त्यावर पाटील हसले, म्हणाले. माझ मातीचा भरावाच काम चालू होत. त्या कामावर जग्याने एक महिना ट्रक ड्रायव्हर म्हणुन काम केले. आणि पैसे न घेताच कामावर यायचा बंद झाला. काहीही कारण न सांगता आठ  दिवस यायचा बंद झाल्यावर, चौकशी साठी मी स्वतः आलो. त्याला काही औषध पाणी केले का विचारले, प्राथमिक दवाखान्यात जावून औषध आणले पण काही फरक पडला नाही म्हणाली.पाटलांनी नोकराला खूण केली. नोकराने पिशवीतून पैशाचे पुडके काढले.पाच हजार रुपये त्याच्या बायकोच्या हातात दिले. ती 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4