डोंगराच्या पायथ्याशी गर्द झाडीत एक गाव लपलेले, होते, एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगराचा विळखा, तर  दुसर्‍या बाजूला त्याला लागूनच असलेला अथांग समुद्र, आणि  त्या  तटावर वसलेल्या गावात निसर्गाची मुक्त हाताने  केलेली उधळण, गाव  छोटे असले तरी,  फळा फुलांनी, पिकांनी समृद्ध. आणि अगदी, शिवरायांच्या काळापासून, नावाने  चालत  आलेल्या आडनावाने त्यांची  हवेली  त्या  शहरात प्रसिद्ध  होती. हवेली  ऊंच पाया असलेली, सागवानी लाकडाचे नक्षी कोरलेले, एका  रेषेत  15 फूटावर  उभारलेले 4 खांब आणि तसेच रुंद ओटा, त्या हवेलीला पेशवेकालीन  झालर होती.  
त्या सुंदर दोन मजली हवेलीत,  दोन भाऊ  राहत होते, एक  राघोबा आणि दुसरा, रघुनाथ,  दोघांचे  वडील सीताराम, आणि  त्यांचे वडील  सखाराम  त्यांना  4 मुले  त्या पैकी  एक  "सीताराम" राघोबा आणि रघुनाथचे वडील . मोठा राघोबा आणि  धाकटा रघुनाथ, 
राघोबाला नवसाने झालेला  एकुलता एक मुलगा.1903 साली  जन्माला आलेल्या मुलाचे  नाव  रामचंद्र  आसे  ठेवले. रघुनाथला 3 मूल आणि  एक  मुलगी, दोन जावा आपल्या 4 मुलासह गुणा गोविंदाने राहत होत्या.  घरात एकोपा, मुल हुशार आणि सामज्यंस, सखारामाची तिन्ही मुले  जवळपास  गावातच वेगवेगळ्या  आळीत  विखुरलेली होती. 
1732 साल  सखाराम आपल्या आई  बापाला आणि बायकोला घेवून  ह्या  गावात रहायला आला, तो येताना शिवरायांच्या पदवीने  सन्मानित  होवून पाटील नाव घेवून आला, ते  ह्या  सुंदर  गावी डोंगराच्या पायथ्याशी आले, त्यांची मुद्दाम रवानगी करण्यात  आली, कारण हा भूप्रदेश तसा पुण्या पासून  जवळ होता, त्यांना मुद्दाम  पेशवांच्या महालात बोलवण्यात आले, ते पेशवांचे डावा हात होते ,पेशवाने त्यांना हा भाग बक्षिसी स्वरूपात दिला, गडाखाली त्या घनदाट जंगलात त्यांना गाव स्थापीत करून राहण्याचे आदेश आले. काही गडावरचे काही, त्यांनी येताना आपल्या बरोबर मदतनीस  आणले.व त्यांना मुलकी पाटील  पद बहाल केल., म्हणजेच शेतसारा वसूल करायचे  काम, त्यामुळे ते  कडक शिस्तीचे,  नियमांचे पालन करणारे, काटेकोर  सवयीचे, तेव्हा पैसा आसला, तरी  प्रामाणिक पणाच्या जोरावर पुष्कळ जमीनी बक्षिस म्हणुन कमावलेल्या, धनधान्याने कोठार भरलेली, फळाफुलांनी डवरलेली झाडे, निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण केलेली, लक्ष्मी आनंदाने पाणी भरत होती. 

त्या ऊंच हवेलीत आज खूप गंभीर  वातावरण होते. 



 राघोबाला नवसाने झालेला  एकुलता एक मुलगा.1903 साली  जन्माला आलेल्या मुलाचे  नाव  रामचंद्र  आसे  ठेवले. रघुनाथला 3 मूल आणि  एक  मुलगी, दोन जावा आपल्या 4 मुलासह गुणा गोविंदाने राहत होत्या.  घरात एकोपा, मुल हुशार आणि सामज्यंस, सखारामाची तिन्ही मुले  जवळपास  गावातच वेगवेगळ्या  आळीत  विखुरलेली होती. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4